Artificial Intelligence (AI) हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे 21 वे शतक हे फक्त Artificial Intelligence तंत्रज्ञानाचे लक्षात ठेवले जाईल. कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात.
जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. आज, मशीन्स तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच काही चांगले काम करतात.
पण जास्त लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे? हे माहीत नाहीय. तसेच ह्याचा वापर कुठे कुठे केला जातो? ह्याचे उपयोग काय आहेत? ह्याबद्दल कमी प्रमाणात माहिती आहे. त्यामुळे आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल (What is Artificial Intelligence in Marathi) संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरुवात करूया..
Artificial Intelligence काय आहे? | What is AI in Marathi
आर्टिफिशयल इंटेलिजन्स हे टेक टिप्स कॉम्प्युटर सायन्स चा एक भाग आहे. एआय ही यंत्रणा, विशेषत: संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ताचे नक्कल करून काम करते. एआय तंत्रज्ञानाच्या मार्फत कोणतीही मशीन मनुष्या सारखे बोलू, वाचू किंवा कोणतीही गोष्ट सहज समजू शकते.
AI तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन मनुष्या सारखे स्वतः डोकं वापरून काम करू शकते. जसे की भाषा ओळखणे, विविध भाषेत बोलणे, आवाज ओळखणे, काम करणे, एकमेकांशी संवाद साधणे, इत्यादी गोष्टी करू शकते. AI चा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) असा आहे.
» Cloud Storage म्हणजे काय? आणि ह्याचा उपयोग कसा करायचा?
एआय बद्दल थोडक्यात माहिती | Brief Information About AI in Marathi
एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्ते सारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या मशीन मधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला मराठी मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो.
जॉन मॅककार्थी (John McCarthy) यांनी 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. भविष्यात ह्याच तंत्रज्ञानाचा बोलबाला असणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे.
» एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?
» FASTag म्हणजे काय? FASTag चा वापर कसा करावा?
छोट्यात छोट्या कामात ह्या एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. तसेच आगामी काळात माहिती तंत्रज्ञाना प्रमाणेच एआय हा मानवी जीवनाचा एक भाग बनेल. मशीन लर्निग हा सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा भाग आहे. ज्यामध्ये एआय वर आधारित मशीन जुना देता एकत्रित करून त्यांच्या मदतीने संपूर्ण माहिती जाणून घेते व त्यामध्ये गरजेनुसार बदल करते.
वर्तमान मध्ये अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. याचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करून ते त्यांची कंपनी मजबूत बनवत आहेत. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत. तिथे ह्यावर नवनवीन प्रयोग होत असतात. तसेच अनेक कॉलेज सुद्धा आहेत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाबद्दल शिक्षण दिले जाते.
AI तंत्रज्ञानाचा कोण कोणत्या क्षेत्रात वापर केला जातो?
आपण एआय तंत्रज्ञान कोण कोणत्या क्षेत्रात वापरले जाते ते पाहणार आहोत. AI तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात वापरले जाते. AI तंत्रज्ञानामुळे कोणतेही काम अवघ्या मिनिटात करता येते. त्यामुळे ह्याचा वापर करून अनेक क्षेत्र विकसित होत आहेत. कोण कोणत्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरले जाते त्याबद्दल खाली जाणून घेऊया.
- Retail, Shopping and Fashion
- Security and Surveillance
- Sports Analytics and Activities
- Manufacturing and Production
» क्रिप्टोकरन्सी काय आहे? आणि क्रिप्टोकरन्सी चे किती प्रकार आहेत?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे प्रकार | Types of Artificial Intelligence in Marathi
AI चे एकूण 7 प्रकार आहेत. तसेच ते कोण कोणते आहेत ते खाली पाहूया..
• Reactive machines
• Limited memory
• Theory of mind
• Self-aware
• Artificial Narrow Intelligence (ANI)
• Artificial General Intelligence (AGI)
• Artificial Super Intelligence (ASI)
» Affiliate Marketing म्हणजे काय? एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवावे?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे उपयोग | Uses of Artificial Intelligence in Marathi
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे होणारे उपयोग अनेक आहेत. आपण रोज वापरणाऱ्या स्मार्टफोन्स मधील ऍप्लिकेशन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञाना चे उदाहरण आहेत. जसे की, Google Lens, AI Camera, Google Assistant, Alexa, Chat Bots, इत्यादी. आपल्या दैनंदिन जीवनात ह्या सर्व एआय तंत्रज्ञानाचा आपण उपयोग करतो.
तसेच अनेक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग केला जातो. आवाज ओळखण्यासाठी, चेहरा ओळखण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. तसेच मोबाईल गेम्स मध्ये सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो. जेव्हा आपण एखादा गेम खेळतो तेव्हा त्या गेम मध्ये आपल्यासोबत समोरून कॉम्प्युटर खेळतो. तर तो कॉम्प्युटर नसून त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केलेला असतो.
कंपन्यांमध्ये एम्प्लॉइज ची ओळख पटवून घेण्यासाठी एआय चा उपयोग केला जातो.
» ऑनलाईन Medicines मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा!
मोठ मोठ्या कंपन्या ग्राहकांच्या सोयीसाठी आणि चांगल्या सुविधेसाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. कंपन्यांच्या वेबसाईट वर एक चॅट बोट असतो. त्यावर ग्राहकाने काही प्रश्न किंवा प्रोब्लेम विचारल्यास ते बोट्स त्यांना उत्तर देतात. व त्यांच्या प्रश्नाचे उत्तरही मिळते. ह्यामुळे ग्राहक खूप आनंदी आणि समाधानी होतो.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग करून अनेक क्षेत्र विकास करत आहेत. अनेक वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध करीत आहेत की, येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग करून अनेक क्षेत्र विकसित होणार आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने मशीन, कॉम्प्युटर आणि यंत्र बनवून भविष्यात महत्वाची कामे करण्यासाठी मानवाच्या बदली वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच कोणतेही कठीण काम एका बुद्धिमान मशीन मार्फत केले जाऊ शकते. तसेच मशीन चा वापर 24 तास केला जाऊ शकतो. त्यामुळे जास्त उपयोग करता येऊ शकतो.
अनेक ऑनलाईन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मार्फत ग्राहकांना अनेक चांगल्या सेवा देऊ शकतात. त्यासोबत डेटा चोरी होणे, ऑनलाईन लिक्स, ऑनलाईन फ्रौडस इत्यादी गोष्टींवर नियत्रंण आणता येऊ शकते. डिजिटल गोष्टीमध्ये AI चा खूप फायदा होऊ शकतो. जसे की स्मार्टफोन्स, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, ऑनलाईन डेटा, फाईल्स सुरक्षित राहू शकतात. कोणीही ह्यांना हॅक किंवा एक्सेस करू शकणार नाही. त्यामुळे गोपनीयता धोरण पाळले जाईल.
» Coding म्हणजे काय? आणि कोडिंग कशी केली जाते?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठून शिकावे? | Artificial Intelligence Course in Marathi
जगभरात एआय तंत्रज्ञाना च्या होणाऱ्या वापरामुळे ह्या क्षेत्रात काम करणे खूप फायद्याचे ठरेल. कारण भविष्यात सगळे आधुनिक होणार आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे एआय शिकणे खूप गरजेचे आहे. तुम्ही एआय ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने शिकू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील.
एआय ऑफलाईन शिकण्यासाठी अनेक IIT कॉलेज उपलब्ध आहेत. तिथे तुम्ही 3 किंवा 5 वर्षाचे ग्रॅज्युएशन पूर्ण करून एआय शिकू शकता. खाली तुम्हाला काही भारतातील टॉप IIT कॉलेजेस ची नावे सांगितली आहेत. तिथून तुम्ही AI Graduation पूर्ण करू शकता.
ऑफलाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठून शिकावे?
▪️ IIM Calcutta
▪️ IIIT Delhi
▪️ ITM Vocational University, Vadodara
▪️ IISC Bangalore
▪️ IIT Hyderabad
ऑनलाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठून शिकावे?
इंटरनेट वर अनेक अश्या वेबसाइट्स आहेत, जिथे तुम्ही ऑफलाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकू शकता. तसेच तुम्ही कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला Certificate सुद्धा मिळते. मी खाली काही टॉप वेबसाइट्स ची नावे दिलेली आहेत. ज्यावरून तुम्ही ऑफलाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकू शकता. काही वेबसाईट वरून फ्री मध्ये तर काही वेबसाईट वरून पैसे देऊन कोर्स करावा लागेल.
▪️ https://www.simplilearn.com
▪️ https://www.learnbay.co
▪️ https://ai.google/education/
» डेबिट कार्ड शिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? पाहा ही सोप्पी पद्धत!
» घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मार्ग!
आशा करतो की तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स द्वारे नक्की सांगा. तसेच ह्या माहितीला सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.
खुप छान माहिती