आजच्या आर्टिकल मध्ये गुगल पे कसे वापरावे आणि गूगल पे म्हणजे काय?(Google Pay information in marathi) ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच गूगल पे वर अकाउंट कसे ओपन करायचे? (How to create google pay account in marathi) हे सुद्धा जाणून घेणार आहोत.
Google Pay हे गूगल कंपनी द्वारा लॉन्च केलेले UPI आधारित डिजिटल पेमेंट ॲप आहे. ह्या ॲप चे नाव अगोदर Google Tez असे होते. गुगल पे हे UPI आधारित कार्य करणारे App आहे, जे NPCI द्वारे संचालित केले जाते. NPCI ही एक सरकारी संस्था आहे, जी भारतातील सर्व बँकिंग प्रणालीला संचालित करते.
ऑनलाईन पेमेंट साठी भारत सरकारने NPCI ची निवड केली. भारतातील सर्व बँकिंग व्यवहार NPCI द्वारे चालवले जातात. गूगल पे सारखे आजुन अनेक ऑनलाईन पेमेंट ॲप आहेत. ज्यांच्या मदतीने आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो. परंतु Google Pay सर्वात जास्त वापरले जाणारे एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे.
गूगल पे वरून तुम्ही मोबाईल रिचार्ज, d2h रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल, पोस्टपेड बिल्स काही मिनिटात भरू शकता. गूगल पे वर नवीन अकाउंट ओपन करणे अगदी सोप्पे आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण गूगल पे काय आहे? आणि गूगल पे कसे वापरावे? ते जाणून घेऊया
सध्या सर्वकाही ऑनलाईन होत आहे. डिजिटल इंडिया मध्ये आपणही डिजिटल राहणे आवश्यक आहे. ऑनलाईन पेमेंट च्या मदतीने आपण आपला वेळ सुद्धा वाचवू शकतो. त्यामुळे गुगल पे चा वापर कसा करावा हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.
गूगल पे काय आहे? (Google Pay information in marathi)
Google Pay हे डिजिटल वॉलेट प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन पेमेंट सिस्टम आहे. गूगल पे ला 11 सप्टेंबर 2015 ला Android Pay अश्या नावाने लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे नाव बदलून 8 जानेवारी 2018, ला Google Pay करण्यात आले.
Google Pay ही सेवा मोबाइल डिव्हाइसवर अॅप-मधील, ऑनलाइन आणि वैयक्तिक खरेदीसाठी विकसित केली आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना Android Phone, टॅबलेट किंवा घड्याळे वापरून पेमेंट करता येते. युनायटेड स्टेट्स (US) आणि भारतातील वापरकर्ते मर्यादित कार्यक्षमतेसह iOS डिव्हाइस वर गूगल पे वापरू शकतात.
या व्यतिरिक्त ही सेवा कूपन, बोर्डिंग पास, कॅम्पस आयडी कार्ड, कार की, इव्हेंट तिकिटे, चित्रपटाची तिकिटे, सार्वजनिक वाहतूक तिकिटे, स्टोअर कार्ड आणि लॉयल्टी कार्ड यांसारख्या पासांना देखील सपोर्ट करते.
याच्या मदतीने आपण ऑनलाईन पेमेंट, मोबाईल रिचार्ज, बिल भरणे तसेच QR Code स्कॅन करून पेमेंट करू शकतो.
Also Read: UPI म्हणजे काय? UPI ने पैसे कसे पाठवायचे?
गुगल पे कसे वापरावे (How to Use Google Pay in Marathi?)
गुगल पे च्या मदतीने आपण बँकेतील तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील ऑनलाईन कामे अगदी सहज करू शकतो. किराणा दुकानातून भले मोठे बिल तुम्ही गूगल पे ने भरू शकता. तसेच तुमच्या दूरवरच्या भावाला लाखांमध्ये पैसे ट्रान्स्फर करू शकता.
गूगल पे वापरण्यासाठी तुम्हाला Google Play Store करून Google Pay ॲप इंस्टॉल करायचे आहे. त्यानंतर मोबाईल मध्ये गूगल पे वर अकाउंट ओपन करून काही मिनिटात ऑनलाईन पेमेंट करू शकता. Google Pay वर नवीन अकाउंट कसे ओपन करायचे? ते खाली जाणून घेऊया.
Google My Business वर फ्री मध्ये बिझनेस अकाउंट कसे बनवायचे? ही पोस्ट नक्की वाचा
गुगल पे वर नवीन खाते कसे ओपन करायचे? (How to Open Google Pay Account in Marathi)
गूगल पे वर नवीन खाते तयार करणे खूप सोपे आहे. त्यासाठी Google Play Store वरून गूगल पे ॲप डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याकडे कोण कोणत्या गोष्टी असणे गरजेचे आहे. ते जाणून घ्या. खालीलप्रमाणे;
Also Read: व्हॉट्सअँप वरून बिझनेस लोन मिळवा काही सेकंदात! जाणून घ्या संपूर्ण माहिती
- बँक अकाऊंट
- डेबिट किंवा क्रेडिट कार्ड
- गुगल खाते (Google/Gmail Account)
- बँक अकाउंट ला लिंक असलेला मोबाईल नंबर. आणि तो लिंक असलेल्या मोबाईल नंबरचे SIM तुमच्या मोबाईल मध्ये ॲक्टिव असणे आवश्यक आहे.
- इंटरनेट आणि SMS सेवा मोबाईल मध्ये चालू असावी
1 . Google Pay ॲप गुगल प्ले स्टोअरवरून इंस्टॉल करून घ्या आणि मोबाईल मध्ये गूगल पे ॲप ओपन करा.
2. त्यानंतर बँक अकाऊंट ला लिंक असलेला मोबाईल नंबर दिलेल्या जागी एंटर करा. आता तुम्हाला तुमचे Gmail Account निवडावे लागेल. ते निवडून घ्या.
3. तुम्ही दिलेला मोबाईल नंबर Verify होईल. त्यानंतर मोबाईल वर आलेला OTP तिथे टाईप करा.
4. गुगल पे ॲप च्या सुरक्षेसाठी Screen Lock किंवा Pin Lock हे दोन पर्याय तुम्हाला दिले जातील. तुमच्या सोयीनुसार एखादा पर्याय निवडून लॉक करा.
5. आता तुमचे गूगल पे ॲप मध्ये नवीन अकाउंट ओपन झाले आहे.
बँक अकाउंट ला गुगल पे मध्ये कसे Add करायचे? ह्यासाठी तुम्ही मराठी टेक कॉर्नर यूट्यूब चॅनल वरील हा व्हिडिओ पाहू शकता.👇🏻
गुगल पे वरून पैसे कसे पाठवायचे?
गुगल पे वरून पैसे पाठवण्यासाठी अनेक पर्याय दिलेले आहेत. त्यांचा वापर करून आपण सहजपणे लाखोंपर्यंत पैसे पाठवू शकतो. तसेच गूगल पे वरून आपण पैसे कसे पाठवू शकतो. त्याबद्दल खाली जाणून घेऊया.
Also Read: Google Images – गूगल वरून Copyright Free Images कसे डाऊनलोड करायचे?
1) QR Code
QR Code हा एक डिजिटल सुरक्षा कोड असतो. आपण क्यूआर कोड ही सुविधा अनेक ठिकाणी बघितली असेल. जसे की, किराणा दुकान, शॉपिंग स्टोअर, बेकरी, शोरुम, इत्यादी. या QR Code च्या मदतीने पैसे पाठवण्यासाठी खालील पद्धत वापरा.
» गुगल पे ॲप ओपन करा.
» डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात तुम्हाला Scan any QR असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
» त्यानंतर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल. त्या कॅमेऱ्याने तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे. त्याचा QR Code Scan करा.
» त्यानंतर तुमचे पेमेंट पूर्ण करा.
Also Read: ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.
Also Read: इंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी ह्या ऍप चा वापर करा!
2) Phone Number
ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीचा Google Pay Number तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यांना त्या नंबर च्या मदतीने पैसे पाठवू शकता. खालील पद्धतीने पैसे पाठवा:
» Phone Number ऑप्शन वर क्लिक करा.
» नंतर तुम्हाला ज्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर वर पैसे पाठवायचे आहेत. त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर तिथे टाईप करा. (त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्याच्या बँक अकाउंट सोबत link असणे आवश्यक आहे)
» त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर तुमच्या समोर त्या व्यक्तीचे नाव आणि अनेक पर्याय दिसतील. त्यातील Pay वर क्लिक करा.
» नंतर तुम्हाला जेवढे पैसे पाठवायचे आहेत. ते एंटर करून तुमचा पासवर्ड टाकून सेंड करा.
3) Bank Transfer
Bank Transfer हा पर्याय वापरण्यासाठी आपल्याकडे समोरच्या व्यक्तीचे Bank Details असणे गरजेचे आहे. बँक अकाउंट नंबर, IFSC Code, व त्या व्यक्तीचे पूर्ण नाव.
Bank Transfer पर्यायावर क्लिक करून त्यांचे Bank Details भरायचे आहे व त्यानंतर हवी ती amount एंटर करून सेंड वर क्लिक करा आणि UPI PIN टाईप करुन पैसे सेंड करा.
Also Read: Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा!
4) Pay to UPI ID
आपल्याकडे जर फक्त समोरच्या व्यक्तीचा UPI Id असेल तर हा पर्याय सर्वात सोप्पा पर्याय आहे. UPI Id तुम्हाला तुमच्या गूगल पे अकाउंट च्या Profile मध्ये मिळेल.
UPI Id or QR ह्या ऑप्शन वर क्लिक करा आणि समोरच्या व्यक्तीचा UPI Id तेथे एंटर करा. त्यानंतर amount एंटर करून सेंड करा.
गुगल पे वरून मोबाईल रिचार्ज कसा करावा?
Step 1 – गुगल पे ओपन करा. त्यानंतर Mobile Recharge ओपशनवर क्लिक करा.
Step 2 – ज्या मोबाईल नंबर वर रिचार्ज करायचा आहे. तो नंबर एंटर करून हवा असलेला रिचार्ज प्लॅन सिलेक्ट करून Pay ऑप्शन वर क्लिक करा.
Step 3 – आता तुमचा पासवर्ड/UPI PIN टाईप करुन पेमेंट पूर्ण करा.
मराठी मध्ये Blogging विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व शिकण्यासाठी आपल्या वेबसाईटच्या Blogging कॅटेगरी ला भेट द्या.
काही प्रश्न तुमच्या मनातील??
गुगल पे वरून Bank Balance कसा चेक करावा?
आपले बँक balance चेक करण्याची सुविधा गुगल पे मध्ये देण्यात आलेली आहे. त्यासाठी Check Bank Balance या पर्यायावर क्लिक करा आणि UPI PIN टाकून Bank Balance चेक करू शकता.
Google Pay वापरण्यासाठी कोण कोणत्या अटी आहेत?
गूगल पे वापरण्यासाठी तुमच्याजवळ एक स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तसेच त्यामध्ये गूगल पे ॲप असणे गरजेचे आहे. आणि तुमच्याकडे एक बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुमच्या जवळ असले पाहिजे.
गूगल पे ॲप कुठून डाऊनलोड करू शकतो?
गूगल पे ॲप तुम्ही Google Play Store वरून Free मध्ये डाऊनलोड करू शकता. तसेच हा ॲप वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.
गूगल पे ॲप कोणत्या सुविधेवर चालते?
गूगल पे हे एक डिजिटल पेमेंट ॲप आहे. तसेच NPCI द्वारे सुरू केलेल्या UPI म्हणजेच Unified Payment Interface ह्या सुविधेवर गूगल पे ॲप चालते. त्यामुळे तुम्ही काही सेकंदात ऑनलाईन पेमेंट करू शकता.
Google Pay वापरत असताना आपण दुसरे Paymet App वापरू शकतो का?
हो.. गूगल पे तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये वापरात असलात. तरी तुम्ही Paytm, Phonpe, FreeCharge, Bhim UPI असे इतर अनेक ॲप वापरू शकता. व त्यांमधून सुद्धा ऑनलाईन पेमेंट करू शकता.
तुम्हाला गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे? (Google Pay information in Marathi) ते समजले असेल. तसेच तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा.
तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्स, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.
Nice Article