डेली टेक अपडेट्स साठी फॉलो करा:- Instagram | Twitter | Facebook
मोबाईल टेक्नॉलॉजी मध्ये दिवसेंदिवस खूप वेगाने प्रगती वाढत चाललेली आहे. Flagship फोन्स ची मागणी वाढत असल्याने अनेक स्मार्टफोन्स बनवणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार नवनवे स्मार्टफोन्स बाजारात आणत आहेत.
OnePlus कंपनी ने नुकतेच OnePlus 9 Series बाजारात आणली आहे. त्यामध्ये OnePlus कंपनी ने नवे Flagship स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हा फोन अमेझॉन वर उपलब्ध असून 15 एप्रिल पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Main Points:-
▪️Amazon Prime मेंबर साठी एक दिवस अगोदर उपलब्ध होणार OnePlus 9 Series स्मार्टफोन.
▪️OnePlus कंपनी ने OnePlus 9 Series मध्ये 3 नवे Flagship स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.
▪️15 April पासून दुपारी 12 वाजता होणार Sale चालू.
OnePlus कंपनी ग्राहकांसाठी चांगले व क्वालिटी स्मार्टफोन्स घेऊन येत असते. त्यांची गेल्या वेलीचीस OnePlus 8 Series खूप लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे आता OnePlus 9 Series मध्ये कोणत्या खास गोष्टी असणार आहे ते आपण खाली पाहूया..
▪️5G स्मार्टफोन घेताय? पाहा हे 5 पावरफूल 5G मोबाईल फोन्स!
OnePlus कंपनी ने OnePlus 9 Series मध्ये OnePlus 9 5G | OnePlus 9 Pro 5G | OnePlus 9R 5G असे तीन Flagship लेव्हल स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हे तिन्ही 5G तंत्रज्ञानावर आधारित असून ह्यात नवा 5G processor वापरण्यात आला आहे. ह्या तिन्ही स्मार्टफोन्स मध्ये Qualcomm Snapdragon 888 5G Processor वापरले आहे.
OnePlus 9 Series मध्ये एक विशिष्ट कॅमेरा सेटअप वापरण्यात आले आहे. तिन्ही स्मार्टफोन्स मध्ये Hasselblad Camera टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे. तसेच fast charging चा सुद्धा सपोर्ट दिला आहे.
OnePlus कंपनी ने OnePlus 9 Series स्मार्टफोन्स मध्ये कोण कोणते नवीन फीचर्स दिले आहेत ते आपण पाहूया..
• OnePlus 9 5G (Specifications)
OnePlus कंपनी ने OnePlus 9 मध्ये 6.55″ Fluid AMOLED Display दिला आहे. तसेच 120Hz रिफ्रेश रेट सुद्धा दिला आहे. तसेच 65T चा Warp चार्जिंग सपोर्ट OnePlus कंपनी ने OnePlus 9 मध्ये दिला आहे. 15 मिनिट्स मध्ये चार्जिंग पूर्ण होण्याचा दावा OnePlus कंपनी ने केला आहे. तसेच फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत Snapdragon 888 5G Processor देण्यात आला आहे. हा प्रोसेसर फक्त Flagship मोबाईल्स मध्ये वापरण्यात येतो. ज्यामुळे मोबाईल अगदी smooth आणि आरामात चालू शकतो. ह्यामध्ये Built in Alexa चा सपोर्ट देण्यात आला आहे.
▪️OTT म्हणजे काय? जाणून घ्या ओटीटी बद्दल संपूर्ण माहिती!
OnePlus 9 मध्ये ट्रीपल कॅमेरा सेटअप वापरण्यात आला आहे. 48MP Main Camera, 50MP Ultra Wide Camera, Monochrome Lens चा वापर केला आहे. तसेच ह्यात 8K व्हिडिओ रेकर्डिंग शूट करू शकतो. ह्यात 4,500 mAh बॅटरी दिलेली आहे. OnePlus 9 ची किंमत ₹49,999 इतकी आहे.
• OnePlus 9 Pro (Specifications)
OnePlus 9 Pro स्मार्टफोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्याचा Main Camera 48MP, 50MP Ultra Wide Camera, 8MP Telephoto Camera, Mono Camera वापरण्यात आला आहे. तसेच ह्यात 4,500 mAh बॅटरी चा सपोर्ट आहे. OnePlus 9 Pro मध्ये 6.7″ Fluid Display 2.O दिला आहे. ह्यामध्ये LTPO टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे. तसेच 120Hz Refresh Rate देण्यात आला आहे.
▪️कोणतीही URL Short कशी करायची?
OnePlus 9 सारखाच ह्यामध्ये सुद्धा Hasselblad Camera टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे. ह्यामध्ये सुद्धा फास्ट चार्जिंग साठी 65T Warp Charging सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे 15 मिनिट्स मध्ये मोबाइल पूर्ण चार्ज होऊ शकतो. Built in Alexa चा सपोर्ट दिला आहे. तसेच warp charge 50 wireless चार्जिंग चा सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. तसेच दमदार Snapdragon 888 5G प्रोसेसर देण्यात आले आहे. ह्याची किंमत ₹64,999 इतकी आहे.
• OnePlus 9R (Specifications)
OnePlus 9R मध्ये Snapdragon 870 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. ह्यामध्ये 4,500 mAh इतकी बॅटरी आहे. तसेच Warp Charge 65 चा सपोर्ट दिला आहे. त्यामुळे 15 मिनिट्स मध्ये चार्जिंग पूर्ण होऊ शकते. Type-C चार्जिंग सपोर्ट दिला आहे. तसेच क्वाड कॅमेरा सेटअप वापरण्यात आला आहे. ज्यामध्ये 16MP Ultra Wide Angle Camera + 48MP Main Camera + 5MP Macro Camera + 2MP Mono Camera देण्यात आला आहे. ज्यामुळे फोटोज् आजुन क्लिअर व व्यवस्थित काढू शकतो.
▪️Top 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल अँप!
6.55″ 2.5D FLUID AMOLED Display दिला असून 120Hz Refresh Rate दिला आहे. हा मोबाईल दोन colors मध्ये उपलब्ध आहे. Carbon Black आणि Lake Blue. त्या सोबत ह्यामध्ये VC कुलिंग सिस्टम, UFS 3.1, Pro Gaming Mode, Dual Sterio Speakers, Haptic Gaming, Multi Layer Cooling System, built-in Alexa इत्यादी फीचर्स मिळतात. 240Hz Touch Sampling Rate फीचर आहे. OnePlus 9R ची किंमत ₹39,999 इतकी आहे.
तसेच तंत्रज्ञानाविषयी आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.
धन्यवाद! जय महाराष्ट्र!