डिजिटल युगात सर्व डिजिटल होत आहे. बँकेतील व्यवहार सुद्धा ऑनलाईन करता येतात. तसेच घरबसल्या बँकेतील व्यवहार करता येतात. पण जेव्हा बँकेमधील असलेले पैसे आपण ATM मधून काढतो, तेव्हा आपल्याला बँकेच्या Debit Card ची गरज लागते. पण कधी कधी चुकून डेबिट कार्ड घरी विसरलो किंवा ऑफिस मध्ये विसरलो, तर आपल्याला ATM मधून पैसे काढता येत नाही. त्यामुळे आपले नुकसान सुद्धा होते.
पण आता तस होणार नाही. कारण भारतातील सर्वात लोकप्रिय बँक SBI ने ग्राहकांसाठी खास नवीन सुविधा दिली आहे. त्या सुविधेचा वापर करून तुम्ही Debit Card चा वापर न करता ATM मधून पैसे काढू शकता. SBI Bank च्या इंटरनेट बँकिंग सुविधा ग्राहकांना अनेक फायदे करून देत आहेत. त्यात आता ही नवीन सुविधा ग्राहकांचे काम सोप्पे करणार आहे. पण ती सुविधा वापरण्यासाठी SBI बँकेच्या एका App चा वापर करावा लागेल.
आज आपण डेबिट कार्ड शिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया..
SBI Bank च्या कोणत्या App चा वापर करावा?
जर तुमचे State Bank Of India मध्ये अकाऊंट असेल. तर तुम्ही SBI बँकेच्या YONO SBI ह्या ऍप वर लॉग इन करा. त्यानंतर तिथे तुम्हाला एक रेफरंन्स नंबर (Reference Number) आणि डायनॅमिक पीन जनरेट Dynamic Pin Generate) करता येईल. आता तुम्ही ह्या दोन गोष्टींचा वापर करून ATM मधून पैसे काढू शकता.
तसेच ह्या PIN चा वापर करून तुम्ही POS Terminal आणि कस्टमर सर्व्हिस पॉईंट (Customer Service Point) मधून सुद्धा पैसे काढू शकता.
» एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?
» FASTag म्हणजे काय? FASTag चा वापर कसा करावा?
YONO SBI App चा वापर करून ATM मधून पैसे कसे काढायचे?
आता आपण YONO SBI App चा वापर करून ATM मधून पैसे कसे काढायचे हे पाहूया. एटीएम मधून बिना डेबिट कार्ड चा वापर करता पैसे काढण्यासाठी तुमच्याकडे ह्या चार गोष्टी असल्या पाहिजे.
- स्मार्टफोन्स
- Internet Connection
- YONO SBI App
- SBI Bank Account
- YONO SBI App ओपन करा. ऍप ओपन करण्यासाठी तुम्ही सेट केले 6 अंकी डिजिटल पिन टाकून योनो ऍपवर लॉगिन करा.
- त्यानंतर योनो पे (YONO PAY) या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर अनेक पर्याय येतील. त्यातील योनो कॅश (YONO CASH) ह्या पर्यायावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर चार पर्याय येतील. ( ATM, Merchant POS, CSP, Careless Shopping ) त्यातील ATM ह्या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर तुमचे डेबिट अकाऊंट सिलेक्ट करा. आता तुम्हाला किती रक्कम काढायची आहे ती तिथे टाईप करा आणि Next वर क्लिक करा.
- यानंतर योनो पीन तिथे टाईप करा आणि Next वर क्लिक करा.
- त्यानंतर तिथे टर्म आणि कंडिशन (T&C) स्विकारून Confirm वर क्लिक करा.
- हे सर्व केल्यानंतर योनो कॅश रेफरंन्स नंबर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आईडीवर वर येईल.
- ATM वर योनो कॅश हा पर्याय येईल तो निवडा.
- आता तुमच्या मोबाईल वर आलेला रेफरंन्स नंबर तिथे टाईप करा.
- यानंतर योनो पीन टाईप करून तुम्ही ATM मधून पैसे काढू शकता.
हे नक्की वाचा:-
» गूगल फॉर्म म्हणजे काय? गूगल फॉर्म कसा तयार करायचा?
» कोणतीही URL Short कशी करायची? पाहा ह्या भन्नाट URL शॉर्टनर वेबसाइट्स!
अश्या प्रकारे तुम्ही डेबिट कार्ड चा वापर न करता ATM मधून पैसे काढू शकता. ही माहिती आवडल्यास जरूर शेअर करा. आणि तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.
1 thought on “डेबिट कार्ड शिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? पाहा ही सोप्पी पद्धत!”