इंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी ह्या ऍप चा वापर करा!


आजच्या लेखात आपण इंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी कोणत्या ऍप चा वापर करू शकतो? (Top 10 Best Instagram Story Maker Apps in Marathi) ते जाणून घेणार आहोत. तसेच ह्या ऍप चा वापर करून तुम्ही आरामात इंस्टाग्राम स्टोरीज बनवू शकता व अपलोड करू शकता.

इंस्टाग्रामचा वापर दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तसेच इंस्टाग्राम वर अनेक जण स्टोरीज अपलोड करतात. तर त्या स्टोरीज आकर्षक व चांगल्या दिसण्यासाठी तुम्हाला काही ऍप चा वापर करावा लागेल.

गूगल प्ले स्टोअरवर असे अनेक ऍप आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही फ्री मध्ये इंस्टा स्टोरी बनवू शकता. आजच्या लेखात आपण त्याच ऍप बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करुया..


इंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी ह्या ऍप चा वापर करा! (Top 10 Best Instagram Story Maker Apps in Marathi)

1 . StoryArt

Story Art हे सर्वात बेस्ट इंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठीचे ऍप आहे. ह्या ऍप ला गूगल प्ले स्टोअर वरून 10 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. स्टोरी आर्ट ह्या ऍप मध्ये 2000+ इंस्टा स्टोरी टेम्प्लेट आहेत.

तसेच 400+ animated templetes, 1000 पेक्षा अधिक इंस्टाग्राम हायलाईट कव्हर आयकॉन्स उपलब्ध आहेत. तुम्हाला स्टायलिश फॉन्ट, कलर, 50+ text animation सुद्धा मिळते. त्यामुळे तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीज जास्त लोकप्रिय होऊ शकतात.


2. StoryLab

StoryLab ऍप चा वापर करून तुम्ही आकर्षित आणि Animated इंस्टाग्राम स्टोरीज बनवू शकता. Story Lab वर 1300+ इंस्टाग्राम स्टोरी टेम्प्लेट, 170+ animated स्टोरीज, 400+ हायलाईट कव्हर आयकॉन्स उपलब्ध आहेत. तसेच हे सर्व अगदी मोफत आहेत. त्यासोबत तुम्ही Trendy Animated Story सुद्धा ह्या ऍप वर बनवू शकता.


3. Story Maker

Story Maker सुद्धा इंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी एक उत्तम ऍप आहे. ह्या ऍप मध्ये 500+ इंस्टाग्राम स्टोरी टेम्प्लेट दिल्या आहेत. तसेच stylish fonts, collage आणि स्टोरी एडिटर टूल्स सुद्धा मिळतात. त्यामुळे तुम्ही स्टोरी मध्ये वेगवेगळे फॉन्ट आणि anination देऊ शकता.

तसेच वेगवेगळे बॅकग्राऊंड कलर, 100+ icons, 100+ टेक्स्ट स्टाईल्स, इत्यादी गोष्टी ह्या ऍप मध्ये मिळतात. त्यामुळे इंस्टाग्राम स्टोरी आकर्षित बनू शकते. व त्यामुळे अनेक लोक तुम्हाला फॉलो करू शकतात. तसेच ह्या ऍप मध्ये तुम्हाला कोणतेही अकाऊंट लॉगिन ची गरज पडत नाही.


4. StoryChic

Story Chic हे ऍप 10 मिलियन पेक्षा अधिक लोकं वापरतात. तसेच ह्या ऍप मध्ये इंस्टाग्राम स्टोरी बनवण्यासाठी 500+ स्टायलिश टेम्प्लेट आहेत. 60+ थीम्स आणि डिझाईन्स सुद्धा वापरायला मिळतात. Animated टेक्स्ट स्टाईल, कलर उपलब्ध आहेत. त्यासोबत Preset Filters & Effects ह्या फीचर्स चा वापर करून तुम्ही इंस्टा स्टोरी मध्ये वेगवेगळे इफेक्ट्स देऊ शकता.

» प्रत्येक मराठी ब्लॉगरने वापरले पाहिजे! असे 10 Chrome Extensions


5. Unfold

Unfold वर 400+ डिझाइन टेम्प्लेट आहेत. तुम्हाला फक्त फोटो किंवा व्हिडिओ त्या डिझाइन टेम्प्लेट मध्ये add करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आकर्षित इंस्टाग्राम स्टोरी बनवून मिळेल. हे ऍप वापरणे खूप सोप्पे आहे. ह्या ऍप चे premium व्हर्जन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला अधिक टेम्प्लेट आणि फीचर्स वापरायला मिळतात.

ह्या ऍप ला एकूण 10 मिलियन लोकांनी डाऊनलोड केले आहे. तसेच ह्या ऍप मधील टेम्प्लेट डिझायनिंग ला अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत.


6. Mostory

Mostory हे animated व्हिडिओ स्टोरी एडिटर ऍप आहे. 300 पेक्षा अधिक स्टोरी animated टेम्प्लेट आहेत. तसेच तुम्ही इंस्टाग्राम स्टोरी picsart फिल्टर्स च्या मदतीने बदलू शकता. 30+ थिम्स चॉइस उपलब्ध आहेत. तसेच lightroom फिल्टर्स, 100+ कॉपीराइट फ्री म्युझिक तुम्ही इंस्टा स्टोरी बनवण्यासाठी वापरू शकता.

» Bot म्हणजे काय? Bot चा उपयोग कुठे केला जातो?


7. Inspiry

Inspiry वर तुम्ही 100+ स्टोरी टेम्प्लेट चा वापर करू शकतो. तसेच टेक्स्ट अँनिमेशन, टेक्स्ट कलर, बॅकग्राऊंड, 15 स्टायलिश फॉन्ट आणि स्वतचे फॉन्ट सुद्धा वापरू शकतो. स्टोरी बनवून झाल्यानंतर तुम्ही त्या स्टोरी चा लगेच preview पाहू शकतो. त्यामुळे स्टोरी बनवणे आजुन सोप्पे होते.

तंत्रज्ञानाविषयी माहिती साठी व टेक टिप्स साठी आमच्या instagram पेज ला फॉलो करा.


8. Story Bit

Story Bit हे सिंपल आणि सोप्पे ऍप आहे. ह्यावरून तुम्ही अनेक इंस्टाग्राम स्टोरी बनवू शकता. तसेच 1000+ इंस्टाग्राम animated स्टोरी डिझाईन्स उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळ्या कॅटेगरी मधील इंस्टाग्राम animated स्टोरी टेम्प्लेट मिळतात. तसेच तुम्ही इंस्टाग्राम सोबत ह्या तयार केलेल्या स्टोरीज व्हॉट्सअँप, फेसबुक आणि यूट्यूब वर शेअर करू शकता.

» 20+ रॉयल्टी आणि कॉपीराइट फ्री इमेज वेबसाइट्स!


9. Canva

Canva हे सर्वात उत्तम ऍप आहे. Canva चे ऍप व्हर्जन आणि वेबसाईट सुद्धा आहे. Canva ऍप वर इंस्टाग्राम स्टोरी बनवू शकता. अनेक प्रकारच्या इंस्टाग्राम स्टोरिज इथे उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही फ्री मध्ये ह्या इंस्टाग्राम स्टोरीज बनवू शकता व इंस्टाग्राम वर अपलोड करू शकता. तसेच इथे तुम्ही लोगो डिझाइन, इंस्टाग्राम पोस्ट, फेसबुक पोस्ट, यूट्यूब टेम्प्लेट सुद्धा बनवू शकता.


10. Story Click

स्टोरी क्लिक ह्या ऍप चा वापर करून इंस्टाग्राम स्टोरी बनवू शकतो. ह्या ऍप वर 300+ Insta स्टोरी टेम्प्लेट उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही ट्रॅव्हल इन्स्टा स्टोरी, वेडिंग स्टोरी, पेट स्टोरी, फॅशन स्टोरी बनवू शकता. तुम्ही स्टायलिश इंस्टाग्राम स्टोरी बनवू शकता.

तसेच वेगवेगळे फॉन्ट, फ्रेम्स, थीम हे फीचर्स उपलब्ध आहेत. तसेच ह्यावर स्टोरी बनवण्यासाठी तुम्हाला अकाऊंट लॉगिन ची गरज लागत नाही.

हे नक्की वाचा:

» मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी ह्या अँड्रॉइड ऍप्लिकेशन चा वापर करा.

» ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.


Tip – ह्या ऍप चा वापर करून तुम्ही इंस्टाग्राम स्टोरी बनवू शकता. तसेच वरील दिलेल्या apps मधील काही ऍप वापरण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तर काही ऍप अगदी मोफत वापरू शकतो.

तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी ह्या ऍप चा वापर करा! (Top 10 Best Instagram Story Maker Apps in Marathi) हा लेख कसा वाटला. ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment