भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांसाठी पॅन कार्ड आवश्यक केले आहे. पॅन कार्ड चा वापर प्रत्येक शासकीय व्यवहारात होतो. तसेच आधार कार्ड (Aadhaar Card) चा उपयोग सुद्धा अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन कामात होतो. पॅन कार्ड आवश्यक झाल्यामुळे आधार कार्ड पॅन कार्ड ला जोडणे (लिंक करणे) गरजेचे झाले आहे. आधार कार्ड पॅन कार्ड ला ऑनलाईन कसे लिंक करायचे? हे आपण मागील आर्टिकल मध्ये जाणून घेतले आहे.
आज आपण पॅन कार्ड बद्दल संपूर्ण माहिती (Pan Card information in Marathi) जाणून घेणार आहोत. तसेच पॅन कार्ड म्हणजे काय? आणि पॅन कार्ड ऑनलाईन कसे Apply करायचे? ते सुद्धा जाणून घेऊया..
पॅन कार्ड म्हणजे काय? (What is PAN Card in Marathi)
पॅन कार्ड असे एक कार्ड (PAN Card) आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते. PAN CARD नंबर म्हणजे एक प्रकारे तुमची संपूर्ण आर्थिक कुंडली. ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटसाठी (Income tax department) आवश्यक असते.
Pan Card चा फुल फॉर्म Permanent Account Number (पर्मनंट अकाऊंट नंबर) असा आहे. पॅन कार्ड वर 10 अंकाचा विशेष कोड असतो किंवा नंबर असतो. त्यामध्ये इंग्रजी अक्षरे आणि इंग्रजी अंक दिलेले असतात.
पॅन कार्ड लॅमिनेटेड कार्डच्या रूपात येतो. पॅनकार्डसाठी (PAN Card) अर्ज केलेल्या लोकांना आयकर विभाग पॅन कार्ड देते. पॅन कार्ड तयार करताना त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार डिपार्टमेंटच्या पॅनकार्डशी जोडले जातात. टॅक्स भरणे, क्रेडिट कार्डद्वारे केलेले आर्थिक व्यवहार या सर्वांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नजर असते.
पॅन कार्ड बद्दल विशेष माहिती मराठी मध्ये
PAN Card च्या नंबरमध्ये खातेदाराचे आडनाव असते.
पॅनकार्डवर खातेदाराचे नाव आणि जन्मतारीख लिहिलेली असते. पण तुमचे आडनाव हे पॅनकार्डच्या (PAN Card) नंबरमध्येही लपलेले असते. पॅन कार्डमधील 10 नंबरपैकी पाचवा अंक तुमचे आडनाव दर्शवतो.
इनकम टॅक्स डिपार्टमेंट आपल्या डेटामध्ये फक्त धारकाचे आडनाव ठेवतो. म्हणूनच PAN नंबरमध्ये देखील त्याची माहिती असते. परंतु इनकम टॅक्स डिपार्टमेंट ही माहिती कार्डधारकांना देत नाही.
» डेबिट कार्ड शिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? पाहा ही सोप्पी पद्धत!
» घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मार्ग!
पॅन कार्ड च्या नंबर विषयी माहिती
- पॅन कार्ड मधील नंबर हा 10 अंकी असतो. प्रत्येकाचा पॅन कार्ड नंबर हा वेगवेगळा असतो. आणि तो नंबर आयकर विभागा ठरवते.
- पॅन कार्ड मधील 10 अंकी नंबर पैकी पाहिले 3 अंक इंग्रजी अक्षरे असतात. त्यामध्ये A to Z पैकी कोणतेही इंग्रजी अक्षर (alphabet) असू शकते.
- त्यानंतर पॅन कार्ड मधील चौथा अंक हा त्या व्यक्तीचे स्टेटस दर्शविते. जसे की खालीलप्रमाणे:
P – सिंगल व्यक्ती
F – फर्म
C – कंपनीच्या नावासाठी
A – AOP (एसोसिएशन ऑफ पर्सन)
T – ट्रस्ट
H – HUF (हिंन्दू एकत्रीत कुटूंब)
B – BOI (बॉडी ऑफ इंडिविजुअल)
L – लोकल
J – आर्टिफिशियल जुडिशियल पर्सन
G – गवर्नमेंट व्यक्ती
- नंतर पाचवा अंक हा आपल्या आडनावाचे पहिले अक्षर असते. जसे की, Panchal तर पाहिले अक्षर “P” हे येणार.
- त्यानंतर उरलेल्या 5 अंकांपैकी 4 अंक असतात. त्यांमध्ये 0001 ते 9999 पर्यंत कोणतेही अंक दिलेले असतात.
- शेवटच्या अंकामध्ये कोणतेही इंग्रजी अक्षर (alphabet) दिलेले असते.
तसेच प्रत्येक व्यक्तीकडे फक्त एकच पॅन कार्ड (Pan Card) असणे गरजेचे आहे.
» गूगल फॉर्म म्हणजे काय? गूगल फॉर्म कसा तयार करायचा?
पॅन कार्ड चा होणारा उपयोग
पॅन कार्ड चा अनेक क्षेत्रात उपयोग केला जातो. आयकर विवरण (रिटर्न) भरताना, टीडीएस दाखवताना, टीडीएसचा परतावा मागताना, आयकर विभागाबरोबर कोणताही पत्रव्यवहार करताना पॅन कार्ड चा वापर केला जातो.
तसेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना पॅन कार्ड नंबर असणे गरजेचे करण्यात आले आहे. बँक खाते उघडायचे असल्यास, टेलिफोनची नवी जोडणी हवी असल्यास, मोबाइलचा नवा नंबर हवा असल्यास पॅन कार्ड द्वारे काढू शकतो.
परकीय चलन खरेदी करताना, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत ठेवताना किंवा काढताना, नवे वाहन खरेदी करताना इत्यादी जवळपास प्रत्येक व्यवहारासाठी आता पॅन कार्ड असणे आवश्यक झाले आहे.
ऑनलाईन पॅन कार्ड कार्ड कसे काढायचे?
ऑनलाईन पॅन कार्ड काढणे खूप सोप्पे आहे. तुम्ही गवर्नमेंट च्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन पॅन कार्ड काढू शकता. त्यासाठी तुम्हाला गवर्नमेंट च्या NSDL वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
NSDL वेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा – PAN Card Apply Online
Pan Card ऑनलाईन Apply करताना लागणारी आवश्यक कागद पत्र
- या अर्जाबरोबर अर्जकर्त्याचे २ रंगीत फोटो
- ओळखीचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- जन्मदिनांक आणि शुल्क इत्यादी द्यावे लागतात.
त्यानंतर यूटीआयच्या केंद्रांवरही छापील अर्ज भरून व त्यासोबत वरील कागदपत्रे जोडून, योग्य ती फी देऊन ऑनलाईन पॅन कार्ड ऍप्लिकेशन करता येते. अर्ज केल्यापासून 10 ते 15 दिवसांत पोस्टाने पॅनकार्ड घरी येते.
आजच्या लेखात दिलेली PAN CARD बद्दल संपूर्ण माहिती! (Pan Card information in Marathi) पॅन कार्ड साठी ऑनलाईन apply कसे करायचे? ही तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.