Meta Tag म्हणजे काय? (Meta Tag information in Marathi) आणि मेटा टॅग वेबसाईट मध्ये कसा ॲड करावा? ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
वेबसाईट वर ब्लॉग पोस्ट बनवल्यानंतर ते पोस्ट गूगल सर्च रिझल्ट्स मध्ये दिसण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. SEO करतो सोशल मीडिया वर ब्लॉग शेअर करतो. पण त्यासाठी तुमची वेबसाईट सर्च इंजिन्स मध्ये सबमिट करणे गरजेचे आहे.
वेबसाईट सबमिट केल्यानंतर गूगल वर सर्च करुन वाचक तुमच्या वेबसाईट ला भेट देऊ शकतात. आणि तुमच्या वेबसाईट वरील ब्लॉग पोस्ट गूगल सर्च रिझल्ट्स मध्ये रँक होण्यास सुरुवात होतात.
पण त्यासाठी तुम्हाला तुमची वेबसाईट वेगवेगळ्या सर्च इंजिन मध्ये सबमिट करावी लागेल. Google व Bing हे दोन सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन्स आहेत. Google Search Console व Bing Webmaster Tools वर वेबसाईट सबमिट केल्यानंतर तुमची वेबसाईट सर्च रिझल्ट्स मध्ये index होण्यास सुरुवात होते.
Google Search Console मध्ये वेबसाईट सबमिट कशी करायची ह्यावर मी एक ब्लॉग लिहिला आहे तो नक्की वाचा.
Meta Tag म्हणजे काय? | Meta Tag Information in Marathi
सर्च इंजिन्स मध्ये वेबसाईट सबमिट करण्यासाठी मेटा टॅग खूप महत्त्वाचा आहे. कारण मेटा टॅग च्या मदतीने आपण वेबसाईट सर्च रिझल्ट्स मध्ये आणू शकतो. पण Meta Tag म्हणजे काय?
तर मेटा टॅग मधून आपण सर्च इंजिन्स ना आपल्या वेबसाईट बद्दल माहिती म्हणजेच वेबसाईट चे नाव, वेबसाईट वर केल्या जाणाऱ्या ब्लॉग पोस्ट, वेबसाईट मध्ये पोस्ट केल्या जाणाऱ्या ब्लॉग्स ची भाषा, वेबसाईट कोणत्या देशातील आहे, वेबसाईट बनवणाऱ्या चे नाव (Author Name), इत्यादी गोष्टींची माहिती देतो.
मेटा टॅग वेबसाईट च्या थीम एडिटर मध्ये ॲड करायचो असतो. तो फक्त त्या वेबसाईट चा मालक (owner) पाहू शकतो. अन्य कोणतीही व्यक्ती तो मेटा टॅग पाहू शकत नाही.
Meta Tag कुठून मिळवायचा?
मेटा टॅग वेबसाईट सर्च इंजिन्स मध्ये सबमिट करताना मिळतो. तो वेबसाईट च्या थीम एडिटर मध्ये ॲड करायचा असतो. त्यानुसार सर्च इंजिन्स आपली वेबसाईट सर्च रिझल्ट्स मध्ये index करतात.
हे नक्की वाचा: Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा!
Meta Tag वेबसाईट मध्ये कसा ॲड करावा?
सर्वात अगोदर तुम्ही वेबसाईट सर्च इंजिन्स मध्ये सबमिट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला एक Meta Tag मिळेल. तो मेटा टॅग Copy करून घ्या.
पुढील पद्धत खालीलप्रमाणे:
Blogger मध्ये Meta Tag कसा ॲड करायचा?
▪️ सर्वात अगोदर तुमच्या वेबसाईट चा Dashboard ओपन करा. आता Theme सेक्शन वर क्लिक करा.
▪️ उजव्या बाजूला Customize असा पर्याय येईल तिथे दिलेल्या Arrow वर क्लिक करा.
▪️ आता तिथे 4 पर्याय येतील. त्यातील Edit HTML वर क्लिक करा. आता तुमच्या समोर तुमच्या वेबसाईट चा HTML फोल्डर ओपन होईल.
▪️ त्यानंतर कॉपी केलेला Meta Tag हेड सेक्शन मध्ये पेस्ट करा. म्हणजेच “<head>” टॅग च्या खाली Meta tag पेस्ट करा व save करा.
▪️ नंतर ज्या सर्च इंजिन वरून मेटा टॅग मिळवला आहे तिथे परत जाऊन Verify वर क्लिक करा.
▪️ अश्या प्रकारे तुम्ही Blogger वर तुमचा मेटा टॅग यशस्वी रित्या ॲड केला आहे.
~ Short Way ~
Dashboard > Theme > Customize > Edit HTML > Header मध्ये पेस्ट करा > Save > Verify वेबसाईट वर क्लिक करा.
तसेच Bing Webmaster Tools मध्ये वेबसाईट कशी सबमिट करायची ह्यावर सुद्धा मी एक ब्लॉग लिहिला आहे. तो ब्लॉग वाचून तुम्ही फ्री मध्ये वेबसाईट सबमिट करू शकता.
हे नक्की वाचा: SEO म्हणजे काय? वेबसाईट साठी SEO कसा करावा?
वर्डप्रेस मध्ये Meta Tag कसा ॲड करायचा?
▪️ वर्डप्रेस वर username आणि पासवर्ड टाकून वेबसाईट ओपन करा. त्यानंतर Dashboard ओपन होईल.
▪️ आता Appearance वर क्लिक करा. त्यानंतर Theme Editor वर क्लिक करा.
▪️ आता तुम्ही जी Theme वेबसाईट वर ठेवलेली आहे ती सिलेक्ट करा. त्यानंतर तिथे दिलेल्या Theme Files मध्ये header.php पर्याय निवडा.
▪️ आता तुमच्यासमोर head सेक्शन ओपन होईल. तिथे
<head> टॅग च्या खाली कॉपी केलेला Meta Tag पेस्ट करा. आणि Update file वर क्लिक करा.
▪️ त्यानंतर ज्या सर्च इंजिन वरून मेटा टॅग मिळवला आहे तिथे परत जाऊन वेबसाईट Verify करून घ्या.
▪️ अश्या पद्धतीने तुम्ही वर्डप्रेस वर मेटा टॅग यशस्वी रित्या
ॲड केलेला आहे.
~Short Way~
Dashboard > Appearance > Theme Editor > Website Theme > Theme Files > header.php निवडा > मेटा टॅग पेस्ट करा <head> tag च्या खाली > Update file > वेबसाईट Verify वर क्लिक करा.
अश्या सोप्प्या पद्धतीने तुम्ही मेटा टॅग तुमच्या वेबसाईट मध्ये ॲड करू शकता. मी तुम्हाला ब्लॉगर व वर्डप्रेस दोन्हीवर कश्या पद्धतीने मेटा टॅग ॲड करायचा ते सांगितले आहे. ते पाहून तुम्ही तुमची वेबसाईट verify करू शकता.
हे नक्की वाचा:
▪️ वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा?
▪️ ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?
तसेच Meta Tag म्हणजे काय? (Meta tag informationa in Marathi) मेटा टॅग वेबसाईट मध्ये कसा ॲड करावा? लेख सोशल मीडिया वर, मित्रांना व ज्यांना मेटा टॅग कसा ॲड करायचा, ह्याबद्दल माहिती नसेल त्यांना हा ब्लॉग नक्की शेअर करा.
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा.तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तंत्रज्ञान, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.