डेली टेक अपडेट्स साठी फॉलो करा:- Instagram | Twitter | Facebook
मायक्रोसॉफ्ट बिंग वेबमास्टर हे एक सर्च इंजिन आहे. ह्यावरून सुद्धा तुम्ही तुमच्या वेबसाईट वर ट्रॅफिक आणू शकता. बिंग सर्च इंजिन हे गूगल सर्च इंजिन प्रमाणेच Free आहे. तुमची वेबसाईट सबमिट करण्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागत नाही. Google Webmaster हे एक लोकप्रिय सर्च इंजिन असले तरी Bing Webmaster हे सुद्धा एक लोकप्रिय सर्च इंजिन आहे. Google Webmaster म्हणजेच Google Search Console. तुम्ही जरी गूगल वेबमास्टर मध्ये तुमची वेबसाईट सबमिट केलेली असली तरी बिग वेबमास्टर मध्ये सबमिट करणे सुद्धा गरजेचे आहे.
आजच्या लेखात आपण नवीन वेबसाईट बिंग वेबमास्टर टूल (Bing Webmaster Tool) मध्ये कशी सबमिट करायची? हे जाणून घेणार आहोत.
ब्लॉग लिहिणाऱ्या प्रत्येक ब्लॉगर ने त्यांची वेबसाईट गूगल सर्च कन्सोल सोबत बिंग वेबमास्टर मध्ये सुद्धा सबमिट केली पाहिजे. ज्यामुळे तुमच्या वेबसाईट वर खूप प्रमाणात रहदारी येण्यास मदत होईल.
◾ ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?
◾ वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा?
नवीन वेबसाईट बिंग वेबमास्टर टूल मध्ये कशी सबमिट करायची? याबद्दल इंटरनेट वर मराठी मध्ये खूप कमी प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. म्हणून अनेक मराठी ब्लॉगर्स ना सर्च इंजिन्स वर वेबसाईट सबमिट करताना अडचण येते. म्हणून मी माझ्या वेबसाईट च्या माध्यमाने ब्लॉगिंग विषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया..
नवीन वेबसाईट बिंग वेबमास्टर टूल (Bing Webmaster Tool) मध्ये कशी सबमिट करायची?
Bing Webmaster Tools हे Microsoft चेच आहे. तसेच ह्या टूल चा वापर URL Submit करण्यासाठी, Data Check, Sitemap submit, इत्यादी गोष्टी चेक करण्यासाठी करता येतो. बिंग वेबमास्टर टूल्स ही फ्री सर्व्हिस आहे. तसेच ह्यावरून खूप मोठ्या प्रमाणात वेबसाईट वर रहदारी आणता येते.
◾ ब्लॉग कसा सुरू करावा? 8 सोप्प्या पद्धती!
Bing Webmaster Tools मध्ये वेबसाईट सबमिट करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला Bing वर एक Free account बनवावे लागते. Sign Up करण्यासाठी तुम्ही windows मधील अकाउंट वरून सुद्धा log in करू शकता. किंवा गूगल अकाउंट वरून सुद्धा लॉग इन करू शकता.
आपण Google Account च्या साहाय्याने अगोदर एक अकाउंट बनवून घेऊया.
Step 1: Bing webmaster tools ची साईट ओपन करा.
Step 2: त्यानंतर Get Started वर क्लिक करा. आता तुम्हाला Sign in करण्यासाठी विचारले जाईल. तुम्ही Microsoft, Google किंवा Facebook अकाउंट च्या साहाय्याने sign in करू शकता. त्यासाठी गूगल वर क्लिक करा. आता तुम्हाला कोणत्या गूगल अकाउंट वरून sign in करायचे आहे त्या अकाऊंट वर क्लिक करा. आणि Sign in करून घ्या.
Step 3: आता तुमच्या वेबसाईट ची URL कॉपी करून घ्या. आणि खाली दिल्याप्रमाणे त्या जागेवर paste करा. त्यानंतर Add वर क्लिक करा.
Step 4: आता तुमच्यासमोर Add & Verify site असे एक पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला 3 प्रकारच्या verification methods दिसतील.
◾ XML File
◾ HTML Meta Tag
◾ Add CNAME record to DNS
तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही निवडू शकता. मी तुम्हाला HTML Meta Tag पद्धत वापरून वेबसाईट verify करून दाखवणार आहे.
HTML Meta Tag वर क्लिक केल्यावर तुम्हाला एक meta tag मिळेल, तो तुमच्या वेबसाईट च्या HTML मध्ये Header section मध्ये पेस्ट करायचा आहे. जर तुम्हाला Meta Tag कसा पेस्ट करायचा ते माहीत नसल्यास खालील दिलेली ब्लॉग पोस्ट वाचा.
◾ Meta Tag वेबसाईट मधील HTML सेक्शन मध्ये कसा पेस्ट करायचा.
Step 5: meta tag पेस्ट केल्यानंतर परत बिंग वेबमास्टर च्या पेज वर येऊन verify वर क्लिक करा. आता तुमची वेबसाईट Verify झाली. आता तुमच्यासमोर Bing Webmaster चा Dashboard ओपन होईल. आता तुमच्या वेबसाईट चा Sitemap तिथे add करा.
अश्या प्रकारे तुम्ही गूगल सर्च कंसोल प्रमाणे मायक्रोसॉफ्ट बिंग वेबमास्टर वर सुद्धा तुमची वेबसाईट सबमिट केली. आता तुमच्या वेबसाईट वर पोस्ट केले जाणारे ब्लॉग्स गूगल प्रमाणे बिंग वर सुद्धा दिसतील. अश्या प्रकारे तुमच्या वेबसाईट ची रहदारी वाढू शकते.
तर नवीन वेबसाईट बिंग वेबमास्टर टूल मध्ये कशी सबमिट करायची? हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा लेख सर्वांना शेअर करा व सोशल मीडिया वर आम्हाला फॉलो करा. तसेच ज्यांना वेबसाईट बिंग वेबमास्टर वर सबमिट करण्याबद्दल माहिती नसेल त्यांना सुद्धा पाठवा.
हे नक्की वाचा:
◾ 5G स्मार्टफोन घेताय? पाहा हे 5 पावरफूल 5G मोबाईल फोन्स!
◾ OTT म्हणजे काय? जाणून घ्या ओटीटी बद्दल संपूर्ण माहिती!
◾ ब्लॉगिंग म्हणजे काय? आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय?
तसेच तंत्रज्ञानाविषयी आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या. तसेच डेली अपडेट्स साठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.
धन्यवाद! जय महाराष्ट्र!
Tumhi khup chan information provide keleli ahe. Je new blogger astat tyana proper guide milt nhi ani te hi confuse hotat kuthe changli, useful information milel. English madhe khup sari information ahe pn lvkr klt nhi. Thanks for such useful information.