वर्डप्रेस वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन कसे सेट करावे?

आज आपण वर्डप्रेस वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन कसे सेट करावे? (How to set web push notifications on WordPress in Marathi) हे पाहणार आहोत.

जास्तीत जास्त वाचकांना आपल्या वेबसाईट वर पुन्हा आणण्यासाठी वेब पुश नोटिफिकेशन सर्वात उत्तम पर्याय आहे. पुश नोटिफिकेशन च्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉग वर लिहिलेली प्रत्येक पोस्ट तुमच्या वाचकांपर्यंत पोहोचवू शकता.

पुश नोटिफिकेशन सुरू करणे काही कठीण काम नाहीय. तुम्ही सोप्प्या पद्धतीने तुमच्या वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन सेट करू शकता. नवीन वेबसाईट वर ट्रॅफिक आणण्यासाठी अनेक पद्धती आहेत. पण पुश नोटिफिकेशन सर्वात सोप्पा आणि फायदेशीर पर्याय आहे.

वर्डप्रेस वेबसाईट वर किंवा ब्लॉग वर Web Push Notifications सेट करण्यासाठी आपल्याला OneSignal App वरून अकाउंट बनवून सर्व सेटअप करावा लागेल. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण वर्डप्रेस वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन कसे सेट करावे? (How to set web push notifications on WordPress in Marathi) हे जाणून घेऊया.

वर्डप्रेस वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन कसे सेट करावे? (How to set web push notifications on WordPress in Marathi)

1. त्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर OneSignal ची वेबसाईट ओपन करून घ्या. त्यानंतर Google अकाऊंट वरून Sign Up करून घ्या.

onesignal website homescreen

2. Sign up केल्या नंतर तुमच्या वेबसाईट चे नाव टाका आणि Web Push पर्याय सिलेक्ट करून Next वर क्लिक करा.

image 1

3. त्यानंतर पुढील स्टेप मध्ये WordPress Plugin or Website Builder हा पर्याय निवडा. आता WordPress वर क्लिक करून खाली scroll करा.

image 2

4. आता खाली तुमच्या वेबसाईट चे नाव आणि वेबसाईट URL टाका. जर तुम्ही तुमच्या वेबसाईट वर SSL सर्टिफिकेट इंस्टॉल केले नसेल नसेल तर My site is not fully HTTPS ह्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Save वर क्लिक करा.

image 3

5. अश्या पद्धतीने तुम्ही OneSignal वर पुश नोटिफिकेशन सेट करू शकता. Save वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला App ID आणि API KEY मिळेल.

image 4

6. APP ID आणि API KEY कॉपी करून घ्या त्यानंतर तुमचे वर्डप्रेस ओपन करून घ्या. त्यात OneSignal App डाऊनलोड करा.

image 5

7. त्यानंतर कॉपी केलेला APP ID आणि API KEY तिथे दिलेल्या जागेवर पेस्ट करा. Safari Web ID हा सफारी ब्राऊझर साठी असतो तो टाकायची काही गरज नाही. जर तुम्हाला टाकायचा असेल, तर App सेटिंग मध्ये मिळेल.

image 6

अश्या प्रकारे तुम्ही काही मिनिटात वर्डप्रेस वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन सेट करू शकता, ते ही अगदी फ्री मध्ये.

हे नक्की वाचा:

▪️ गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे?

▪️ E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!

वर्डप्रेस वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन कसे सेट करावे? हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच हा लेख सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका.

तसेच तंत्रज्ञानटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

धन्यवाद! जय महाराष्ट्र!

3 thoughts on “वर्डप्रेस वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन कसे सेट करावे?”

Leave a Comment