आजच्या ब्लॉग मध्ये आपण गूगल गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे बनवावे? How to create Google Adsense Account (Marathi) हे जाणून घेणार आहोत. Google Adsense चे ॲप्रोवल मिळणे हे प्रत्येक ब्लॉगरचे स्वप्न असते.
गूगल ऍडसेन्सच्या यादी मध्ये गूगलने मराठी वेबसाइट्स ना सुद्धा add केले आहे. त्यामुळे मराठी ब्लॉगर्स सुद्धा वेबसाईट वर adsense add लावून पैसे कमवू शकतात.
आजच्या ब्लॉगमध्ये आपण गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे? हे सध्या सोप्या भाषेत जाणून घेऊ.
गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे बनवावे? | How to create Google Adsense Account (Marathi)
गुगल ऍडसेन्ससाठी अर्ज करण्याअगोदर तुमच्याकडे एक जीमेलचा Gmail Account असणे आवश्यक आहे.
हे नक्की वाचा: इंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी ह्या ऍप चा वापर करा!
स्टेप १ – Google वर जाऊन Google Adsense असे सर्च करा. त्यानंतर तुमच्या समोर एक वेब पेज ओपन होईल. जसे खाली दिले आहे तसे.
स्टेप २ – त्यानंतर तिथे दिलेल्या Sign up now बटणावर क्लिक करा.
स्टेप ३ – Sign up now वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्यात तुमच्या ब्लॉग / वेबसाईटची URL व तुमचा Gmail id तिथे एंटर करा.
स्टेप ४ – पुढील स्टेपमध्ये तुमच्या देशाचे नाव निवडून गुगल ऍडसेंच्या नियम आणि अटी मान्य करा.
स्टेप ५ – नंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यात तुमचा पत्ता बरोबर असल्याची खात्री करून घ्या. (थोड्या दिवसांनी गुगलकडून ह्याच पत्त्यावर व्हेरिफिकेशनसाठी एक कोड पाठवला जातो.)
हे नक्की वाचा: मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी ह्या अँड्रॉइड ऍप्लिकेशन चा वापर करा.
स्टेप ६ – आता तुमच्या वेबसाईटला गुगल ऍडसेन्स जोडण्यासाठी तुमच्यासमोर एक कोड येईल. तो कोड तुम्हाला तुमच्या वेबसाईटच्या <head> section मध्ये add करावा लागेल. तुमच्या वेबसाईट क्या Theme section मध्ये जाऊन header मध्ये हा कोड add करा किंवा एखादे header and footer वाले plugin इंस्टॉल करा.
हे नक्की वाचा: गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे?
स्टेप ७ – Google Adsense चा कोड add केल्यानंतर The code was fount असा मेसेज तुमच्या स्क्रीन वर दिसेल.
स्टेप ८ – हे सर्व झाल्यानंतर थोड्याच दिवसांत गुगल तुमची वेबसाईट चेक करून तुम्हाला Google Adsense साठी Approval देईल. जर तुमचे Content चांगले असेल आणि तुमची व्यवस्थित SEO केला असेल तर तुम्हाला लवकरच ॲप्रोवल मिळेल.
जेव्हा तुम्हाला गूगल कडून ऍडसेन्स चे approval मिळेल. तेव्हा तुम्ही जो Gmail id तिथे एंटर केलेला, त्यावर तुम्हाला एक मेल येईल. त्यानंतर तुम्ही Google Adsense अकाउंट वर जाऊन Auto Ads किंवा Manually Ads ह्या दोन्ही पैकी एखादे ऑप्शन सुरू करू शकता. त्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर जाहिरात दिसणे सुरू होतील.
Tip:- तुमच्या Google Adsense अकाउंट वर Earnings at risk – You need to fix some ads.txt file issues to avoid severe impact to your revenue असा मेसेज दिसत असेल, तर Fix now वर क्लिक करा. त्यानंतर ती ads.txt फाईल डाउनलोड करून घ्या. आता ती फाईल डाउनलोड करून तुमच्या वेब होस्टिंगच्या root directory मध्ये ही ads.txt फाईल अपलोड करा. त्यानंतर तुमच्या Adsense अकाउंट वर हा मेसेज दिसणार नाही.
जेव्हा तुमच्या Adsense अकाउंट वर $10 होतील, तेव्हा
काही दिवसानंतर तुम्हाला Adsense Account वर Identity Verification साठी एक मेसेज दिसेल. तिथे तुम्हाला तुमचे सरकारी डॉक्युमेंट पैकी Pan Card, Voter ID, Pass Port, Driving Licence एखादे अपलोड करावे लागेल. तुम्हाला ह्या डॉक्युमेंट चा फोटो काढून तिथे सबमिट करावा लागेल. त्यानंतर थोड्याच दिवसांनी तुम्हाला तुमच्या Adsense Account वर Address Verification Code सबमिट करा असा मेसेज दिसेल. तुमच्या पत्यावर एक Address Verification Code येईल. तो Adsense अकाउंट वर जाऊन सबमिट करा.
त्यानंतर $100 अमेरिकी डॉलर तुमच्या अकाउंट मध्ये पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी Adsense अकाउंट मध्ये Bank Details add करावे लागतील. प्रोसेस पूर्ण झाल्यावर पेमेंट मिळण्यासाठी तुमच्या अकाउंट वर $100 अमेरिकन डॉलर ऍडसेन्सला जमा असणे आवश्यक आहे. $100 अकाउंट मध्ये पूर्ण झाल्यावर महिन्याच्या 21 तारखेला गुगलतर्फे तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्स्फर केले जातील.
हे नक्की वाचा:
ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?
वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा?
FAQs –
Google Adsense अकाउंट ओपन करण्यासाठी किती वय असणे गरजेचे आहे?
गूगल ऍडसेन्स ला अर्ज करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. किंवा तुम्ही तुमच्या पालकांच्या नावावर ऍडसेन्स अकाउंट ओपन करू शकता.
गूगल ऍडसेन्स अकाउंट वर किती वेबसाईट add करू शकतो?
गूगल ऍडसेन्स अकाउंट वर तुम्ही कितीही वेबसाईट add करू शकता. परंतु जेव्हा तुमच्या एका वेबसाईट वर प्रॉब्लेम होईल, तेव्हा तुमच्या इतर वेबसाइट्स ना सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो.
ही पोस्ट वाचून तुम्ही सुद्धा काहीच मिनिटात गूगल ऍडसेन्स अकाउंट बनवू शकता (How to create Google Adsense Account (Marathi) तसेच तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्स, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.