Reliance Jio Price Hike: एअरटेल, आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) च्या रिचार्ज वाढी नंतर भारतातील सर्वात श्रीमंत टेलिकॉम कंपनी Jio ने सुद्धा त्यांचे प्रीपेड प्लॅन्स ची किंमत वाढवली आहे.
भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया नंतर आता रिलायन्स जिओनेही प्री-पेड दर वाढवण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओने आपल्या प्री-पेड सेवांच्या दरांमध्ये 21 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
रिलायन्स जियो ने वाढवली प्री-पेड प्लॅन्स ची किंमत! 1 डिसेंबर पासून लागू होणार ह्या नवीन किमती..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या या निर्णयानंतर जिओचा 75 रुपयांचा मासिक प्लॅन 1 डिसेंबरपासून 91 रुपयांचा होईल. त्यासोबत 129 रुपयांचा प्लॅन 155 रुपयांचा होईल. तर 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 479 रुपयांचा होईल.
Airtel Prepaid Recharge Plans: एअरटेल प्रीपेड रिचार्ज ची किंमत वाढली! पाहून घ्या रिचार्ज किंमत..
तसेच 1299 रुपयांचा प्लॅन 1559 रुपयांपर्यंत आणि 2399 रुपयांचा प्लॅन 2879 रुपयांपर्यंत वाढेल. ह्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ ने सांगितले की त्यांच्या डेटा टॉप-अप प्लॅनच्या किंमती देखील वाढणार आहेत.
Data TOP-UP Plans
Current Price (Rs) | New Price (Rs) | Benefits |
51 | 61 | 6GB |
101 | 121 | 12GB |
251 | 301 | 50GB |
अश्या प्रकारे रिलायन्स जिओ चे सुद्धा प्रीपेड प्लॅन्स ची किंमत वाढणार आहे. त्यामुळे आता रिचार्ज करताना थोडा जास्त खर्च होऊ शकतो.