स्मार्टफोन चा वापर वाढल्यापासून प्रत्येक क्षेत्रात आता स्मार्टफोन ची गरज लागते. छोट्यात छोट्या कामात सुद्धा मोबाईल ची गरज पडते. स्मार्टफोन मध्ये मिळणाऱ्या नवनवीन फीचर्स मुळे स्मार्टफोन वापरणे खूप सोप्पे झाले आहे. कधी कामानिमित्त बाहेर गेल्यावर किंवा ऑफिस मधल्या कामासाठी स्मार्टफोन ची गरज पडते.
पण त्या स्मार्टफोन साठी सुद्धा मार्केट मध्ये किंवा ऑनलाईन गॅजेट्स उपलब्ध आहेत. त्या गॅजेट्स चा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोन ला अधिक सुरक्षित आणि उपयोगी बनवू शकता. आज आपण स्मार्टफोन साठी उपयोगी असे 5 गॅजेट्स फक्त 500 रुपयांमध्ये! ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
स्मार्टफोन साठी उपयोगी असे 5 गॅजेट्स फक्त 500 रुपयांमध्ये!
1.Powerbank
जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर प्रवास करायचा असेल, तेव्हा तुम्ही स्मार्टफोन्स चा वापर करता. पण स्मार्टफोन मध्ये चार्जिंग नसल्याने स्मार्टफोन बंद पडू शकतो. पण कधी महत्वाचे काम असेल तर स्मार्टफोन कसा वापरायचा तर पॉवरबँक चा वापर करून तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता. व तुमचे महत्वाचे काम करू शकता.
तसेच तुम्हाला 500Rs च्या आतमध्ये एखादी चांगली पॉवरबँक ऑनलाईन मिळेल. पॉवरबँक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇🏻
» टॉप 10 बेस्ट पॉवरबँक 1000 रुपयां खालील!
2. Waterproof Mobile Pouch
पावसाळ्यात मोबाईल वापरणे अशक्य असते. कारण मोबाईल हे वॉटरप्रूफ नसतात. त्यामुळे ते स्मार्टफोन्स भिजले की लगेच खराब होऊ शकतात. पण जर तुम्ही Waterproof Mobile Pouch मध्ये तुमचा स्मार्टफोन ठेवला, तर तो पावसापासून किंवा पाण्यापासून सेफ आणि सुरक्षित राहेल.
» ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.
3. Earphones
तुम्ही गाणी ऐकण्यासाठी तसेच ऑडियो रेकॉर्ड करण्यासाठी Earphones चा वापर करू शकता. Earphones मध्ये वेगवेगळ्या क्वालिटी असतात. पण तुम्ही BoAt ह्या कंपनीचे एअरफोन्स घेऊ शकता.
» मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्यासाठी हे ऍप वापरा!
4. Screen Cleaning Gel
मोबाईल वर धूळ, कचरा साचतो म्हणून मोबाईल कधी कधी स्वच्छ दिसत नाही. तसेच डिस्प्ले वर टचेस केल्यामुळे आपल्या बोटांचे ठसे उमटलेले दिसतात. त्यामुळे मोबाईल खूप खराब दिसतो. ऑनलाईन मिळणाऱ्या Screen Cleaning Gel चा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल ला स्वच्छ ठेवू शकता.
» Top 21 Online Shopping Sites in India
5. Pendrive
जर तुम्ही ब्लॉगर असाल किंवा कोणता बिझनेस करत असाल, तर तुमच्या महत्वाच्या फाईल्स, फोटोज्, व्हिडिओज तुम्ही pendrive मध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि हवं तेव्हा मोबाईल ला कनेक्ट करून तुम्ही हव्या त्या फाईल्स, फोटोज् पाहू शकता. Pendrive चा वापर केल्याने तुम्ही कुठेही आणि कधीही तुम्हाला हव्या त्या फाईल्स व फोटोज् पाहू शकता. आणि मोबाईल मधील स्टोरेज सुद्धा फूल होणार नाही.
» घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मार्ग!
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती आवडल्यास मित्रांना व सोशल मीडिया वर शेअर करा.तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.