OTT म्हणजे काय? ओटीटी प्लॅटफॉर्म बद्दल माहिती, तसेच OTT Meaning in Marathi याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल. OTT चा फुल फॉर्म काय आहे तसेच OTT चे काही फायदे आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
इंटरनेट मुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले. सगळ्या क्षेत्रात इंटरनेट चा वापर केला जातो. इंटरनेट तसेच नवीन टेक्नॉलॉजी मुळे आपल्या काम करण्याचा पद्धतीत आमूलाग्र बदल झाले.
अश्याच प्रकारे ओटीटी (OTT) ने सुद्धा मनोरंजन क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले. आजच्या काळात OTT Platforms खूप लोकप्रिय होत आहेत. आजची युवा पिढी OTT Platforms ना खूप जास्त महत्त्व देत आहेत.
OTT ची लोकप्रियता पाहता हल्ली खूप चित्रपट हे थिएटर च्या ऐवजी OTT Apps किंवा OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित (Release) होतात. OTT काय आहे? याबद्दल बहुतांश लोकांना माहिती नाही आहे. तर आज मी तुम्हाला OTT काय आहे आणि OTT Apps म्हणजे काय या बद्दल माहिती सांगणार आहे.
OTT म्हणजे काय? | OTT Meaning in Marathi
OTT चा फुल फॉर्म Over-The-Top (ओवर-द-टॉप) असा आहे. OTT वर तुम्हाला नवीन प्रदर्शित चित्रपट, वेब सीरिज किंवा अन्य मीडिया कंटेंट पाहायला मिळते. थोडक्यात सांगायचे झाले तर OTT हे Video Streaming Service आहे. अमेरिकेत ह्याला खूप मागणी आहे. काही वर्षापासून भारतात OTT सर्व्हिस ला मागणी वाढत आहे. विशेषज्ञांच्या माहितीनुसार येणाऱ्या काही वर्षात OTT प्लॅटफॉर्म चा वापर व त्यावरील कंटेंट खूप जास्त प्रमाणात पाहिले जाऊ शकतात.
ओटीटी ऍप काय आहे? (OTT Apps information in Marathi)
OTT Apps वर वेब सीरिज, चित्रपट, मालिका इत्यादी पाहू शकतो. हे OTT Apps मोबाईल वर किंवा स्मार्ट टीव्ही वर सुद्धा डाऊनलोड करून वापरता येतात. OTT Apps वर टेलिव्हिजन कंटेंट उपलब्ध केले जाते. प्रेक्षक त्यांच्या आवडीनुसार हवे तेव्हा इंटरनेटच्या साहाय्याने आवडीचे कार्यक्रम, मालिका व टीव्ही शोज पाहू शकतात.
आजकाल खूप OTT Apps तसेच OTT Platforms उपलब्ध आहेत. काही ओटीटी ऍप हे त्यांच्या वेब सीरिज मुळे लोकप्रिय होत आहेत.
हे नक्की वाचा:-
» SSD म्हणजे काय? SSD की HDD नक्की कोणते आहे फायदेशीर!
» Google My Business वर बिझनेस अकाऊंट कसे बनवायचे?
OTT सर्व्हिस चे काही फायदे
Over-The-Top (OTT) चे तसे अनेक फायदे आहेत. आपल्याला आपल्या आवडीचे कार्यक्रम किंवा चित्रपट बघण्यासाठी केबल किंवा D2h कनेक्शन ची गरज लागते. पण ओटीटी कंटेंट व शोज बघण्यासाठी फक्त इंटरनेट ची आणि एका स्मार्टफोन ची आवश्यकता असते.
ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा ओटीटी ऍप वर ओरिजनल कंटेंट, वेब सीरिज, नवीन चित्रपट तसेच जुने चित्रपट, डॉक्युमेंट्री इत्यादी बघू शकतो. हे बाकी कुठेही उपलब्ध नसतात फक्त ओटीटी प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असतात.
गेल्या काही वर्ष पासून अनेक ओटीटी सुविधा पुरविणाऱ्या कंपनी जसे की Amazon Prime, Netflix त्यांचे स्वतःचे ओरिजनल कंटेंट, वेब सीरिज तसेच चित्रपट बनवत आहेत.
Over-The-Top (OTT) सर्व्हिस प्रेक्षकांसाठी खूप सोयीची आहे. लोक त्यांच्या सोयीनुसार हवं तेव्हा, हवं त्या ठिकाणी ओटीटी ऍप चा वापर करू शकतात. ओटीटी ऍप जसे की स्मार्ट टीव्ही, टॅबलेट, स्मार्टफोन, इत्यादींवर चित्रपट व ओरिजनल कंटेंट बघितले जाऊ शकतात.
स्मार्टफोन, टॅबलेट मध्ये ओटीटी उपलब्ध आहेत. हे ऍप गूगल प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर वरून डाउनलोड करता येतात. आजकाल बाजारात मिळणाऱ्या स्मार्ट टीव्ही वर मध्ये सुद्धा OTT App चा सपोर्ट असतो. लॅपटॉप तसेच कॉम्पुटर बर सुद्धा OTT App सर्व्हिस उपलब्ध आहे. तसेच Streaming Device च्या साहाय्याने सुद्धा
ओटीटी कंटेंट बघता येतात. बाजारात मिळणाऱ्या Amazon Fire Tv Stick, Apple Tv, Chromecast इत्यादींच्या साहाय्याने OTT कंटेंट बघता येतो.
See Also: घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मार्ग!
ओटीटी सर्व्हिस चे काही प्रकार | Types Of OTT Services in Marathi
Transactional Video On Demand ( TVOD )
ह्या प्रकारच्या ओटीटी सर्व्हिस मध्ये कोणताही चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो फक्त एकदा बघण्यासाठी रेंट (भाडे) वर दिला जातो किंवा विकत घेण्यासाठी उपलब्ध असतो. Apple iTunes ह्याचे एक उदाहरण आहे.
Subscription Video On Demand ( SVOD )
ह्या सर्व्हिस मध्ये व्हिडिओ स्ट्रिमिंग कंटेंट बघण्यासाठी पैसे देऊन त्या ऍप चे मासिक किंवा वर्षाचे सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागते. अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स हे ग्राहकांसाठी सबस्क्रिप्शन सुविधा पुरविते. हे प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन च्या आधारावर त्यांचे ओरिजनल कंटेंट आणि वेब सीरिज ग्राहकांना उपलब्ध करून देतात.
Advertising Video On Demand ( AVOD )
ह्या ओटीटी सर्व्हिस मध्ये युजर ला जाहिरात ( Advertise ) बघावी लागते. ह्या ओटीटी सुविधेमध्ये युजर ला कंटेंट मोफत उपलब्ध करून दिले जाते. पण त्यासोबत युजर ला Ads बघाव्या लागतात. ह्या Ads व्हिडिओ स्वरूपात बघाव्या लागतात.
ओटीटी प्लॅटफॉर्म व ओटीटी ऍप | OTT Platforms in India
भारतात खूप ओटीटी प्लॅटफॉर्म व ओटीटी ऍप उपलब्ध आहेत. प्रत्येक ओटीटी सर्व्हिस युजर ला वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामध्ये मालिका, वेब सीरिज, स्पोर्ट्स, चित्रपट, लाईव्ह टीव्ही, डॉक्युमेंटरी, टीव्ही शोज, किड्स शो इत्यादी सुविधा मिळतात.
OTT Platforms जे भारतात खूप लोकप्रिय आहेत |
- Netflix
- Disney+ Hotstar
- SonyLIV
- Voot
- Amazon Prime Video
- Zee5
- ALTBalaji
- JioCinema
OTT Platforms बद्दल संपूर्ण माहिती मी सविस्तर सांगितलेली आहे.
तुम्हाला ओटीटी बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल अशी मी आशा करतो. तसेच तुम्हाला OTT म्हणजे काय? आणि OTT Meaning in Marathi काय आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल.
माहिती आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तंत्रज्ञानाविषयी माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट ला भेट द्या.
खूप छान उपक्रम आहे तुमचा मराठी लोकांसाठी. धन्यवाद!