Google Photos वापरणाऱ्या प्रत्येक युजरला आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. गूगल ने ही माहिती त्यांच्या सर्व युजर्सना एक अधिकृत मेल पाठवून दिली आहे.
गूगल कंपनी मार्फत अनेक सेवा मोफत दिल्या जातात. त्यामुळे प्रत्येक जण गूगल च्या मोफत सर्व्हिस चा वापर करतो. परंतु आता गूगल च्या ह्या सर्व्हिस साठी पैसे द्यावे लागणार आहेत.
तुम्ही जर तुमचे फोटो आणि व्हिडीओज Google Photos वर सेव्ह करुन ठेवत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना 6 महिन्यांपूर्वी याबाबत एक मेल पाठवला होता. त्यांनी पाठवलेल्या मेल मध्ये त्यांनी असे म्हंटले होते की, तुम्ही गुगल फोटोज अॅपमध्ये अपलोड केलेले कोणतेही फोटो तुमच्या अकाऊंटसोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट होतील.
तसेच 1 जून 2021 पासून हाय क्वालिटी मध्ये सेव्ह करण्यात आलेले सर्व नवे फोटो आणि व्हिडीओज गुगल अकाऊंटसह मिळणाऱ्या 15GB स्टोरेज स्पेस किंवा तुम्ही खरेदी केलेल्या Additional Storage स्पेसमध्ये काऊंट केले जातील. त्यामुळे गुगलची गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली Unlimited Storage सर्व्हिस 31 मे 2021 पासून अस्तित्वात नसनार आहे.
Google कंपनीने गुगलच्या इतर सर्व्हिसेस, जसे की गुगल ड्राईव्ह आणि जीमेल प्रमाणे गुगल फोटोज स्पेसदेखील काऊंट करण्याचा निर्णय घेतला आहे
कंपनी त्यांच्या पेड सर्व्हिसेसना वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने गूगल कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनी Google One द्वारे पेड सर्व्हिसेस पुरवत आहे. त्यामुळे गूगल कंपनी ने गूगल फोटोज् वर पेड सर्व्हिस देण्याचे काम सुरू केले आहे.
1 जून 2021 पासून हाय क्वालिटीमधील कोणत्याही फाईल्स तुमच्या गुगल अकाऊंटमध्ये स्टोर करत असाल आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही 15 जीबीची लिमिट क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा क्लाऊड स्टोरेजसाठी Google One चं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल, किंवा फोटोजमध्ये फ्री स्टोरेजसाठी जुना डेटा डिलीट करावा लागेल. Google One चं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला दर वर्षाला 19.99 डॉलर्स (₹1,467) रुपये द्यावे लागणार. यामध्ये तुम्हाला 100 जीबी डेटा मिळेल.
त्यासोबत किती स्टोरेज वापरले गेले ह्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी गूगल कंपनीने एक नवं टूल आणले आहे. या टूलद्वारे तुम्हाला तुम्ही किती स्टोरेज स्पेस वापरली आहे, ह्याबद्दल संपूर्ण माहिती देत राहील. हे टूल तुम्हाला तुमचे फोटोज, व्हिडीओ आणि अन्य कॉन्टेंटच्या बॅकअपच्या हिशेबाने माहिती देत राहील.
तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.