Facts About Google in Marathi – गूगल बद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्स | Google Facts in Marathi

Google Facts in Marathi – आजच्या लेखात आपण गूगल बद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्स (Facts About Google in Marathi) जाणून घेणार आहोत. गूगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. तसेच गूगल कंपनीचे सर्च इंजिन शिवाय इतर अनेक प्रॉडक्ट्स सुद्धा लोकप्रिय आहेत. गूगल ह्या कंपनी बद्दल आपल्याला काही खास गोष्टी माहिती नाही आहेत. त्यामुळे आज आपण गूगल बद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्स (Facts About Google in Marathi) पाहणार आहोत.

गूगल कंपनीची स्थापना सप्टेंबर 1998 मध्ये लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन यांनी केली होती. तेव्हा ते पीएच.डी. कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थी होते. गूगल एलएलसी (Google LLC) ही अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. जी इंटरनेटशी संबंधित सेवा आणि उत्पादनांमध्ये माहिर आहे, ज्यात ऑनलाइन जाहिरात, तंत्रज्ञान, शोध इंजिन (Google Search Engine), क्लाऊड कम्प्युटिंग, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा समावेश आहे. 4 सप्टेंबर, 1998 रोजी कॅलिफोर्निया मध्ये गूगल चे मुख्यालय होते. त्यानंतर 22 ऑक्टोबर 2002 रोजी गूगलला डेलॉवरमध्ये पुन्हा एकत्रित केले गेले. जुलै 2003 मध्ये गुगल कॅलिफोर्निया मधील माउंटन व्ह्यू येथील मुख्यालयात स्थापन करण्यात आले.

गूगल बद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्स | Facts About Google in Marathi

▪️ गूगल हे जगात सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.

▪️ गूगल चे पूर्वीचे नाव हे Backrub असे होते. त्यानंतर ते बदलून Google असे ठेवण्यात आले.

▪️ Online Video Streaming Content पाहण्यासाठी गूगल कंपनीने त्यांचे स्वतःचे “Chromecast” नावाचे dongle लॉन्च केले. हे dongle स्मार्ट टीव्ही ला जोडून इंटरनेट च्या मदतीने ऑनलाईन चित्रपट किंवा वेब सीरिज पाहू शकतो.

▪️ गूगल कंपनीची स्थापना लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन यांनी 1998 ला केली होती. 2 ऑक्टोंबर 2015, ला सुंदर पिचाई ह्यांना गूगलच्या सीईओ पदी निवड करण्यात आली.

▪️ Google च्या मुख्यालयामध्ये 200 हुन अधिक शेळ्या पाळल्या आहेत. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये. ह्या कारणामुळे Google ने 200 शेळ्या कार्यालयात पाळल्या आहेत. ह्या शेळ्या लॉन मधील गवत खातात. ज्यामुळे गावात कापनीच्या मशीनचा वापर होत नाही व आवाजही होत नाही.

▪️ गूगल ही कंपनी दर वर्षाला नवनव्या कंपन्या विकत घेत असते. तसेच गूगल ही कंपनी cloud computing, internet, Computer software and hardware, artificial intelligence, advertising ह्या सर्व्हिस देणारी कंपनी सुद्धा आहे.

▪️ गूगल ही कंपनी प्रत्येक सेकंदाला ₹ 1,30,900 कमावते. अमेरिकन डॉलर मध्ये $1748.71 इतके होतात.

▪️ Gmail ही जगप्रसिद्ध सेवा सुद्धा गूगल ह्या कंपनीची आहे. ईमेल पाठवण्यासाठी Gmail चा वापर केला जातो. Gmail चा फुल फॉर्म Google Mail असा आहे. 1 एप्रिल, 2004 मध्ये गूगल ने Gmail नावाची ईमेल सेवा सुरू केली.

▪️ Google Adword म्हणजेच Google Ads ही सुद्धा एक फेमस जाहिरात दाखवणारी सेवा आहे. ही सुद्धा गूगल द्वाराच चालवली जाते. ची सुरुवात करण्यात आली. Google Adword हे नाव बदलून Google Ads करण्यात आले आहे. G Ads च्या मदतीने आपण आपले कोणतेही प्रॉडक्ट/सर्व्हिस/वेबसाईट/ब्लॉगपोस्ट गूगल च्या सर्च रिझल्ट्स मध्ये टॉप 10 क्रमांकांवर दाखवू शकतो. त्यासाठी तुम्हाला ठराविक पैसे द्यावे लागतात.

▪️ तसेच 1998 पासून गूगल ने Google Doodle ही सुविधा सुरू केली. Google Doodle मध्ये विविध सणांविषयी माहिती डूडल पोस्ट द्वारे म्हणजेच एका चलचित्राद्वारे गूगल वर दाखवली जाते. दिवाळी, होळी, जयंती, वाढदिवस अश्या वेळी गूगल डूडल तयार करून ते Google Home Page वर दाखवले जातात.

▪️ गूगल ह्या कंपनीचा स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये लोकप्रिय आहे. त्यांच्या लूक साठी, त्यांच्या फिचर्स साठी आणि त्यांच्या क्वालिटी साठी सुद्धा. Google Pixel हे त्या स्मार्टफोन चे नाव आहे.

▪️ Google चा एका वर्षाचा रेव्हेन्यू $182,527,000,000 अमेरिकन डॉलर इतका आहे.

▪️ गूगल ने अनेक प्रॉडक्ट लॉन्च केले. तसेच ते जगप्रसिद्ध आहेत. गूगल ने कोण कोणते प्रॉडक्ट लॉन्च केले ते पाहूया. गूगल चे स्वतःचे प्रॉडक्ट आहेत. जे खूप सुरक्षित आणि लोकप्रिय आहेत.

Google CardboardSearch Console
Google SheetsAdMob
Keep NotesGoogle Pixel
Google MapsGoogle Earth
Google AnalyticsGoogle Workspace
PhotosGoogle Duo
ChromecastGmail
Google SheetsChrome Web Store

▪️ Google ची 2020 मधील ९०% कमाई ही फक्त जाहिरातींमधून आली होती. 146.92 अब्ज डॉलर्स एवढी होती.

▪️ जगातील सर्वात लोकप्रिय कंपनीच्या वेबसाइट कोड मध्ये 23 मार्कअप एरर आहेत. प्रत्येक आठवड्यात 20,000 पेक्षा अधिक लोक Google मध्ये नोकरी साठी अर्ज करतात.

▪️ गूगल चे Home Page म्हणजे मुखपृष्ठ इतके रिकामी कसे? तर त्याचे मुख्य कारण म्हणजे सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज ह्यांना HTML चे पूर्णपणे ज्ञान नव्हते. त्यामुळे तेव्हा त्यांना होमपेज इतका आकर्षित बनवता आला नाही.

▪️ Google चे Search Engine हे 100 दशलक्ष गिगाबाइट (GB) चे आहे. इतका डेटा साठवून ठेवण्यासाठी एक टेराबाइट च्या एक लाख ड्राईव्ह ची गरज पडते. गूगल सर्च इंजिन हे जगात सर्वाधिक वापरले जाते. त्यामुळे डेटा साठवण्यासाठी इतकी जागा गरजेची पडते.

▪️ गूगल ह्या कंपनी ने 2006 साली YouTube ही कंपनी खरेदी केली. यूट्यूब हे ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूब वर चॅनल बनवणे व व्हिडिओ शेअर करणे अगदी मोफत आहे. तसेच YouTube Channel वर Google Ads दाखवून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता.

▪️ Google वर प्रत्येक सेकंदाला 70,000 पेक्षा अधिक शोध घेतला जातो. तसेच दर वर्षाला Google वर 12.69 मिलियन सर्च केले जाते.

▪️ गूगल वर सर्वाधिक YouTube हे शोधले जाते. त्या पाठोपाठ फेसबुक, जीमेल आणि अमेझॉन सर्वात जास्त शोधले जाते.

▪️ Google चे Google Home नावाचे प्रॉडक्ट आहे. त्याचा वापर करण्यासाठी आपल्याकडे सर्वात चांगले इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. गूगल होम वरून तुम्ही हवामान, गाणी, बातम्या इत्यादी गोष्टी ऑनलाईन ऐकू शकता.

▪️ Google ह्या कंपनी ने स्मार्टफोन सोबत त्यांचे SmartWatch देखील लॉन्च केले आहेत. जे खूप लोकप्रिय आहेत.

▪️ Google AdMob ही सेवा Android Apps वर जाहिराती दाखवण्यासाठी वापरली जाते.

▪️ गूगल चे स्वतःचे Android सॉफ्टवेअर सुद्धा आहे. हे सॉफ्टवेअर अँड्रॉइड फोन मध्ये वापरले जाते. तसेच नुकतेच Android 12 अपडेट लॉन्च झाले आहे.

▪️ Google AdSense ही सेवा सुद्धा गूगलचीच आहे. ह्याच्या मार्फत आपण आपल्या वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनल वर Google Ads दाखवू शकतो. ही सेवा सुद्धा अगदी मोफत आहे.

▪️ Google त्यांच्या प्रतिस्पर्धी Apple ला त्यांच्या Mobiles मध्ये Google Search Engine डिफॉल्ट राहावे यासाठी सुमारे 15 कोटी दरवर्षी देते. जर त्यांनी असे नाही केले, तर Apple स्वतःचे सर्च इंजिन सुरू करेल. त्यामुळे Google ची लोकप्रियता व कस्टमर सर्व कमी होतील व त्यांच्याकडे जातील.

तुम्हाला गूगल बद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्स (Facts About Google in Marathi) कसे वाटले. असेच टेक फॅक्ट्स मराठी मध्ये वाचण्यासाठी Digital Khajina वेबसाईट ला भेट द्या.

Guest Post by :- Team Digital Khajina (Admin)

Thank you for reading this article.

Leave a Comment