boAt कंपनीचे boAt Immortal 700 हेडफोन लॉन्च! जाणून घ्या किंमत आणि फिचर्स..

boAt कंपनीने त्यांचे आजुन एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. boAt कंपंनीने Immortal 1000D, Immortal 1300 आणि Immortal 200 हे हेडफोन्स अगोदर लॉन्च केले आहेत. ह्या headphones च्या मिळालेल्या यशस्वी लोकप्रियतेनंतर आता ह्या कंपनीने boAt Immortal 700 हा नवा Headphone मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. boAt हेडफोन्स च्या Immortal सिरीज मधील हा चौथा हेडफोन आहे.

Boat Immortal 700 हेडफोनमध्ये नवनवीन फिचर्स आणि डिझाईन्स दिले आहेत. तसेच boAt Immortal 700 ची किंमत किती आहे, ते सुद्धा जाणून घेऊया. Gamers साठी हा हेडफोन खूप फायद्याचा ठरणार आहे. चला तर मग त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.

boAt कंपनीचे boAt Immortal 700 हेडफोन लॉन्च!

boAt Immortal 700 Headphone Specifications (बोट इमोर्टल ७०० हेडफोनचे स्पेसिफिकेशन्स)

ह्या हेडफोन मध्ये 50 mm ऑडिओ ड्रायव्हर दिले आहे. त्यासोबत 7.1 व्हर्च्यूअल चॅनेल सराउंड सपोर्ट सुद्धा ह्यामध्ये देण्यात आला आहे. ह्यामुळे Audio अनुभव आजुनच चांगला अनुभवता येऊ शकतो. Boat Immortal 700 Headphone खास भारतीय गेमर्स साठी dedicated आहे. त्यामुळे हेडफोन च्या डिझाईन गेमिंग लूक देण्यात आले आहे. ह्या हेडफोन मध्ये USB कनेक्टिव्हिटी दिली आहे. तसेच ह्यात RGB LED देण्यात आली आहे.

Boat Immortal 700 मध्ये पाच वेगवेगळे MODE दिले आहे. हेडफोन मध्ये In-line रिमोट कंट्रोल देखील दिले आहे. ज्यामुळे तुम्ही RGB LED, Audio, माइक कंट्रोल करू शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमचा गेमिंग अनुभव आजुन चांगल्या प्रकारे घेता येईल.

Boat Immortal 700 Headphone Price (बोट इमोर्टल ७०० हेडफोन ची किंमत)

Boat Immortal 700 हेडफोन ची किंमत Rs. 2,499/- इतकी आहे. तसेच Zest Money वरून तुम्ही हे प्रॉडक्ट 3 इंटरेस्ट टाईप मध्ये खरेदी करू शकता. ज्यामध्ये तुम्ही तीन महिन्यात Rs. 833/- असे भरून हे प्रॉडक्ट ऑनलाईन खरेदी करू शकता. तसेच boAt वेबसाईट वरून हे हेडफोन खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करताना, तुम्ही LazyPay वरून खरेदी केल्यास तुम्हाला 20% कॅशबॅक सुद्धा मिळू शकतो. हे हेडफोन फक्त Amazon ह्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही येथून खरेदी करू शकता. किंवा boAt कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरून सुद्धा खरेदी करू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तंत्रज्ञानाविषयी अशीच नवनवीन माहिती मराठी मध्ये वाचण्यासाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.

Leave a Comment