Tata Sky हे d2h प्लॅटफॉर्म आहे. ज्याची स्थापना 10 ऑगस्ट 2006 रोजी झाली होती. Tata Sky ने त्यांची री-ब्रॅण्डिंग आहे. त्यांनी Tata Sky चे नाव बदलून Tata Play असे केले आहे. यानंतर Tata Play मध्ये टीव्ही कम ओटीटीचा विस्तार होणार आहे. Tata Play या डायरेक्ट टू होम (डीटूएच) प्लॅटफॉर्म मध्ये १३ ओटीटी सर्विसचा समावेश करण्यात आला आहे. ह्या OTT प्लॅन्समध्ये नेटफ्लिक्सचा समावेश केला आहे. ज्यामुळे टीव्ही चॅनल्स सोबत Netflix चा सुद्धा आनंद घेता येईल.
तसेच Tata Play Binge पॅक मध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि Disney+Hotstar, ALTBalaji, Voot, SonyLiv सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात आला आहे. ३९९ रुपये प्रति महिन्याच्या कॉम्बो पॅकची सुरुवात २७ जानेवारी पासून करण्यात आली आहे. ह्या पॅक मध्ये सर्व OTT सुविधा मिळणार आहेत. कॉम्बो पॅक मधून तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉप, तसेच मोठ्या स्क्रीन सारख्या डिव्हाइसवर आपल्या पसंतीचा कंटेंट पाहू शकतो. तसेच Tata Sky Fiber चे नाव सुद्धा बदलण्यात आले आहे. आणि Tata Play Fiber असे ठेवले आहे.
Tata Play च्या कमर्शिअल जाहिरातीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर, अभिनेता सैफ अली खान आणि आर. माधवन ह्यांनी काम केले आहे. Tata Sky म्हणजेच Tata Play ही कंपनी वॉल्ट डिस्नी आणि टाटा सन्स ची आहे. तुम्हाला Tata Play बद्दल ऑफर्स जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती जाणून घेऊ शकता.
तंत्रज्ञानाविषयी अशीच नवनवीन माहिती मराठी मध्ये वाचण्यासाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.