Beta Version काय आहे? प्रत्येक ऍप सोबत Beta Version ची सुविधा का दिलेली असते. तसेच Beta म्हणजे काय? आणि Beta Program बद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तसेच Beta Program मध्ये सहभागी कसे व्हायचे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे अनेक नवनवीन प्रयोग आणि टेक्नॉलॉजी लोकांसमोर येत असतात. स्मार्टफोन चा वापर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे सोशल मीडिया ऍप किंवा नॉर्मल ऍप चे प्रमाण वाढत आहे.
लॅपटॉप, कॉम्प्युटर्स पेक्षा लोक जास्त स्मार्टफोन चा वापर करतात. कारण स्मार्टफोन हा वापरण्यास सोयीचा आहे. तसेच विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे नवनवीन Apps लॉन्च होत आहेत. अनेक जण स्मार्टफोन वर खूप सारे Apps वापरतात.
पण हे Apps डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला अँड्रॉइड स्मार्टफोन्स मध्ये Google Play Store तर ऍपल स्मार्टफोन्स मध्ये App Store वरून Apps डाऊनलोड करावे लागतात. मात्र त्या ऍप च्या खाली beta program दिलेला असतो.
ह्या बीटा प्रोग्राम मधून त्या ऍप चे नवीन व्हर्जन किंवा फीचर्स सर्वात अगोदर beta program मध्ये सहभागी असलेल्या युजर्स ना मिळतो.
पण Beta Program आणि Beta Version नक्की आहे तरी काय? ह्याचा वापर कशासाठी केला जातो. ह्याबद्दल सविस्तर माहिती खाली जाणून घ्या.
Beta Version काय आहे? (What is Beta Version)
Beta Version म्हणजे कोणत्याही प्रोग्राम किंवा ऍप्लिकेशन चे पहिले स्वरूप (Version) ज्यामध्ये नवीन फीचर्स आणि सुविधा दिलेल्या असतात. ह्या सुविधा सर्वात अगोदर वापरण्यासाठी beta program मध्ये सहभागी व्हावे लागते.
हे बीटा व्हर्जन एक टेस्टिंग व्हर्जन असते, ते काही लोकांना वापरायला दिले जाते. वापरून झाल्यानंतर त्या बीटा व्हर्जन बद्दल फीडबॅक, त्यातील चुका, नवीन फीचर्स कसे आहेत. त्याबद्दल माहिती त्या ऍप्लिकेशन च्या कर्मचाऱ्यांना सांगायची असते.
हे बीटा व्हर्जन डेवलोपर द्वारा तयार केले जाते. कोणत्याही ऍप चे बीटा व्हर्जन तयार केल्यावर ते काही निवडक सामान्य लोकांना वापरायला दिले जाते. बीटा व्हर्जन हे कोणत्याही ऍप किंवा प्रॉडक्ट च्या सामान्य रिलीज होण्याच्या अगोदर तयार केलेले (Pre – release) व्हर्जन असते.
Beta Testing च्या अगोदर तो ऍप किंवा प्रॉडक्ट अल्फा टेस्टिंग मधून टेस्ट केला जातो. ही अल्फा टेस्टिंग ऍप किंवा प्रॉडक्ट बद्दल परीक्षण करण्याकरिता डेव्होलोपर मार्फत केली जाते. सॉफ्टवेअर तयार केल्यावर त्याची बीटा टेस्टिंग करणे गरजेचे आहे.
डेव्होलोपर ने तयार केलेलल्या सॉफ्टवेअर किंवा प्रॉडक्ट चे बीटा व्हर्जन जेव्हा जास्तीत जास्त लोकांमार्फत वापरले जाते. तेव्हा त्या प्रॉडक्ट किंवा सॉफ्टवेअर मध्ये असलेल्या चुका, bugs दिसून येतात. आणि त्यानुसार बीटा व्हर्जन मध्ये बदल करून ऑफिशियल सॉफ्टवेअर किंवा प्रॉडक्ट लॉन्च केले जाते.
» गूगल फॉर्म म्हणजे काय? गूगल फॉर्म कसा तयार करायचा?
» Google मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची?
Beta Testing काय असते ?
Beta Testing करण्याचे मुख्य उद्दिष्ट हेच असते की, सॉफ्टवेअर किंवा प्रॉडक्ट वापरणाऱ्या वेगवेगळ्या युजर्स कडून त्या सॉफ्टवेअर बद्दल परीक्षण आणि त्यातील काही त्रुटी काढणे. ह्या त्रुटी आणि बग्ज (bugs) डेव्होलोपर दुरुस्त करून एक फायनल सॉफ्टवेअर लॉन्च केले जाते.
जर बिना बीटा टेस्टिंग केल्या सॉफ्टवेअर किंवा प्रॉडक्ट सर्वांसाठी लॉन्च केले. तर त्या सॉफ्टवेअर मध्ये खूप समस्या आणि बग्स (bugs) येत राहणार. त्यामुळे सॉफ्टवेअर वापरताना खूप अडचण येऊ शकते. ज्यामुळे त्या सॉफ्टवेअर किंवा ऍप बद्दल युजर्स नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकतात. त्या कारणाने बीटा टेस्टिंग केले जाते.
Beta Version मध्ये सहभागी कसे व्हायचे?
जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर Google Play Store वर जाऊन तुमच्या Gmail अकाऊंट ने गूगल प्ले स्टोअरवर लॉग इन करा. त्यानंतर कोणतेही ऍप सर्च करा. जसे की तुम्ही व्हॉट्सअँप (WhatsApp) सर्च करू शकता. त्यानंतर त्याच्या खाली Join Beta असे दिलेले असेल. (खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे👇🏻)
तिथे Join वर क्लिक करा. त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही त्या ऍप च्या बेटा टेस्टिंग प्रोग्राम मध्ये सहभागी होऊ शकता. त्यानंतर जेव्हाही त्या ऍप चे बेटा व्हर्जन येईल तेव्हा तुम्हाला Early Access असा नोटीफिकेशन येईल. अश्या प्रकारे तुम्ही ते बेटा व्हर्जन इंस्टॉल करून वापरू शकता.
» Artificial Intelligence काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे कोण कोणते उपयोग आहेत?
बीटा टेस्टिंग केले जाणारे काही ऍप्लिकेशन
- Zee5
- Paytm
- Amazon Prime Video
- Flipkart
- Myntra
- PhonePe
ह्या ऍप चे तुम्ही बेटा टेस्टिंग व्हर्जन वापरू शकता. आणि ह्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.
ही माहिती वाचून तुम्हाला Beta Version काय आहे? Beta Program मध्ये सहभागी कसे व्हायचे? ह्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल. माहिती कशी वाटली ते कमेंट्स द्वारे नक्की सांगा. आणि तुमच्या मित्रांना व सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.