तुम्ही काही प्रश्नांचे उत्तर किंवा माहिती शोधण्यासाठी Google ओपन करता. तेव्हा तुम्हाला Google च्या मुख्यपृष्ठावर एक नवीन फोटो किंवा अॅनिमेटेड फोटो दिसतो. त्याला Google Doodle असे म्हणतात. त्यामध्ये एक संदेश आणि एक युनिक डिझाइन दिलेली असते. गूगल कंपनी हे खास फोटो त्या कार्यक्रमाला किंवा त्या दिवसाला साजरा करण्यासाठी करते.
Google Doodles हे जगभरात प्रसिद्ध आहेत. गूगल कंपनी त्यांच्या युजर्स साठी नवनवीन गोष्टी आणत असते. Doodle हे साधे आणि सोपे असल्याने ते खूप आकर्षित असतात.
आज आपण Google Doodle काय आहे?(What is Google Doodle in Marathi) ह्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Google Doodle काय आहे? (What is Google Doodle in Marathi)
गूगल काही खास दिवशी त्यांच्या अधिकृत लोगो च्या इथे अॅनिमेटेड फोटो किंवा होवर टेक्स्ट (Hover Text) ठेवतो, त्याला Google Doodle असे म्हणतात. गूगल डूडल हे खास देशांच्या सुट्टी, कार्यक्रम, कामगिरी आणि उल्लेखनीय ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व साजरा करण्याच्या उद्देशाने तयार केले जातात. तयार केलेले सर्व डूडल गुगलच्या मुख्यपृष्ठांवर “Google” लोगोच्या जागी तात्पुरते ठेवले जातात. म्हणजेच एका विशेष दिवशी ठेवले जातात.
सर्वात पहिले गूगल डूडल हे नेवाडा येथील ब्लॅक रॉक सिटीमध्ये बर्याच काळ चालणार्या वार्षिक बर्निंग मॅन कार्यक्रमाच्या 1998 आवृत्तीचे (Edition) गौरव करण्याकरता तयार करण्यात आले होते. तसेच डूडल बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना “Doodlers” असे म्हणतात. आता पर्यंत Doodlers नी गूगल साठी 4,000 डूडल बनवले आहेत.
- Google Lens म्हणजे काय? गूगल लेन्स चा वापर कसा करायचा?
- गूगल ऍनालिटिक्स (Google Analytics) वर अकाऊंट कसे बनवावे?
तसेच गूगल डूडल मध्ये गेम्स सुद्धा बनवले जातात. हे गेम्स तुम्ही ऑनलाईन खेळू शकता. हे गेम्स खेळण्यासाठी खूप सोप्पे आहेत.
गूगल कंपनी चे काही लोकप्रिय डूडल
Google ने सेलिब्रेट केलेले Google Doodle ची नावे
1998 मध्ये गूगलने प्रथम डूडलच्या सहाय्याने थँक्सगिव्हिंगची सुट्टी साजरी केली. तसेच सुट्टी, कार्यक्रम आणि इतर उत्सवांसाठी अनेक डुडल्स वार्षिक आधारावर तयार करण्यात आले. खाली काही सणांच्या किंवा सुट्टीच्या दिवशी बनवण्यात आलेल्या डूडल बद्दल माहिती जाणून घेऊया. तसेच ते कोणत्या वर्षी पासून तयार करण्यात आले त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया.
▪️2010 च्या सुरूवातीस डूडल च्या वारंवारता आणि जटिलता या दोन्हीमध्ये वाढ झाली. जानेवारी २०१० मध्ये पहिले अॅनिमेटेड डूडल सर इसाक न्यूटनचा (Sir Isaac Newton) ह्यांच्या सन्मानाकरता बनवण्यात आले होते.
▪️2014 पर्यंत, Google ने त्याच्या मुख्यपृष्ठावर 2,000 क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय डूडल प्रकाशित केले आहेत.
▪️Gregorian New Year (2000 – present)
▪️Martin Luther King, Jr. Day (2003; 2006 – present)
▪️Lunar New Year (2001; 2003 – present)
▪️Valentine’s Day (2000 – present)
▪️International Women’s Day (2005; 2009 – present)
▪️Dr APJ Abdul Kalam
▪️Teacher’s Day
▪️Earth Day (2001 – present)
▪️Mother’s Day (2000 – present)
▪️Father’s Day (2000 – present)
▪️U.S. Independence Day (2000 – present)
▪️Bastille Day (2000 – present)
▪️German Unity Day (2002 – 2003; 2006 – 2008; 2010 – present)
▪️Swiss National Day (2001 – 2015; 2016 – present)
▪️Holi (2001 – present)
▪️Halloween (1999 – present)
▪️Hinamatsuri (2009 – 2012; 2014 – present)
▪️U.S. Thanksgiving Day (1998 – present)
▪️Christmas Day (1999 – present)
▪️New Year’s Eve (2011 – present)
▪️Republic Day Of India
▪️Independence Day of India
काही गूगल डूडल गेम्स (Google Doodle Games)
- Baseball
- Pac-Man
- Quick, Draw!
- The Scoville Game.
- Basketball.
- Halloween.
- Garden Gnome.
- Coding Rabbit.
- Loteria
Google Doodle Games खेळण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा. तसेच खूप चे आजुन Doodles पाहण्यासाठी गूगल वर Google Doodles असे सर्च करा.
तसेच तुम्हाला गूगल डूडल काय आहे? (What is Google Doodle in Marathi) बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. ही माहिती आवडल्यास मित्रांना व सोशल मीडिया वर शेअर करा. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.