108MP कॅमेरा असलेल्या Realme 8 सीरिज ची प्री-बुकिंग Flipkart वर झाली सुरू! पाहा कशी करायची बुकिंग


डेली टेक अपडेट्स साठी फॉलो करा:- Instagram | Twitter | Facebook


ठळक मुद्दे
• Realme 8 सीरिज 24 मार्च ला संध्याकाळी 7:30 वाजता लॉन्च होनार.
• Realme 8 Pro हा कंपनीचा पहिला 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन असणार आहे.
• प्री-बुकिंग करणाऱ्यांना फोन सोबत एक भेटवस्तू देण्यात येणार आहे.


Realme 8 सीरीज ची प्री-बुकिंग 15 मार्च पासून सुरु झाली आहे. 15 ते 22 मार्च पर्यंत प्री-बुकिंग चालू असणार आहे। Realme 8 आणि Realme 8 Pro स्मार्टफोन ची प्री-बुकिंग करण्यासाठी तुम्हाला Flipkart वर जाऊन स्मार्टफोन्स रजिस्टर करावा लागेल।

Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन स्मार्टफोन येत्या 24 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 वाजता लॉन्च होणार आहेत. नुकतेच Realme इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी Realme 8 सीरिज स्मार्टफोनचा फर्स्ट लूक त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून दाखवला होता. रियलमी कंपनीच्या इन्फिनिटी सेल मध्ये ग्राहकांना Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन स्मार्टफोन्स बुक करता येणार आहेत. तसेच प्री-बुकिंग करणाऱ्यांना Realme Buds Air Neo वर 50% डिस्काउंट मिळणार आहे. हा सेल Flipkart आणि Realme.com या वेबसाईट्सवर सुरू करण्यात आला आहे. बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना फक्त 1080 रूपये भरावे लागतील.


Realme 8 सीरिज
image credits:- realme india

Realme 8 फोनची प्री-बुकिंग कशी करायची?

  • Flipkart अँप वर तुमच्या मोबाईल नंबर ने रजिस्टर करून घ्या.
  • नंतर Realme 8 | 8 Pro प्री-बुकिंग करण्यासाठी फ्लिपकार्ट वर Flipkart Electronic Gift Voucher विकत घ्या. त्यासाठी 1080 रुपये द्यावे लागतील.
  • त्यानंतर 25 मार्च ला फ्लिपकार्ट वर येऊन Realme 8 | 8 Pro चेक करा नंतर Realme 8 | 8 Pro विकत घ्या.
  • अधिक माहितीसाठी फ्लिपकार्ट वर भेट धा..

Realme 8 आणि Realme 8 Pro मधील फीचर्स:-

Realme 8 सीरिज स्मार्टफोन मध्ये 108 मेगापिक्सेल चा
कॅमेरा असणार आहे. 108 मेगापिक्सेल कॅमेऱ्यात 9 इन 1 पिक्सेल बाइनिंग मिळणार आहे. ज्यामुळे लो-लाईट फोटोग्राफी आजुन चांगल्या प्रकारे करता येईल. Realme 8 pro सुपर स्लिम आणि लाईट असणार आहे. 8.1mm स्लिम (पातळ) असणार आहे. आणि 176 ग्राम वजन असणार आहे. तसेच टाइम लैप्स व्हिडिओज साठी Starry Mode और 3x zoom असणार आहे।

ह्या स्मार्टफोन मध्ये 6.4 इंच सुपर एमोलेड डिस्प्ले असणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये नियो पोट्रेट, डायनॅमिक बोकेह पोट्रेट आणि AI कलर पोट्रेटचा सपोर्ट असणार आहे. या स्मार्टफोनची इमेज प्रोसेसिंगही जलद असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच Realme कंपनीचे सीईओ माधव शेठ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वर Realme 8 | 8 Pro मोबाईल चे फर्स्ट लूक दाखवले आहे.


तंत्रज्ञानाविषयी अधिक माहितीसाठी तसेच लेटेस्ट टेक न्यूज साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या. डेली अपडेट्स साठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.


Leave a Comment