Chinese Apps Ban: 2020 मध्ये केलेल्या चिनी ॲप्स वरील Surgical Strike नंतर आता परत एकदा भारत सरकारने चीनी अॅप्सवर मोठी कारवाई केली आहे. Free Fire सोबत इतर 53 चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. रिपोर्ट नुसार, भारतीयांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याने हे Chinese Apps Ban केले आहेत.
बंदी घातलेल्या 54 अॅप्सच्या यादीतील बहुतेक अॅप्स चिनी फेमस कंपन्या, अलिबाबा, Tencent आणि NetEase शी संबंधित आहेत. 2020 मध्ये बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सपैकी बहुतेक अॅप्स “रीब्रांडेड किंवा रीक्रिस्टेड” होते. त्यामुळे भारतीय आयटी विभागाने हा निर्णय घेतला आहे.
भारतीय मंत्रालयाने सांगितले की, हे 54 चिनी अॅप्स भारतीयांचा डेटा चीनसारख्या देशातील सर्व्हरवर ट्रान्सफर करत होते. आयटी मंत्रालयाने गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप्लिकेशन ब्लॉक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अधिका-याने सांगितले की, “54 अॅप्स आधीच भारतात प्लेस्टोअरद्वारे ऍक्सेस करण्यापासून ब्लॉक करण्यात आले आहेत.” माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत नवीनतम आदेश देण्यात आला आहे.
- Nothing Phone 3a 5G : नथिंगचा मध्यम ते उच्च श्रेणीचा ५जी स्मार्टफोन
- ऑनलाईन कोर्स म्हणजे काय? ऑनलाईन कोर्स कसे करतात? | Online Course information in Marathi
- Samsung Galaxy S25 Ultra 5G: एक पॉवरहाऊस फ्लॅगशिप
- २०२५ मधील टॉप टेक्नॉलॉजी ट्रेंड्स : Top Technology Trends in 2025
- Samsung Galaxy S25 FE Review : वैशिष्ट्ये, आणि बरंच काही!
जून, 2020 पासून भारत सरकारने 224 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. अगोदर भारताने 59 अॅप्सवर बंदी घातली होती. ज्यामध्ये TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC Browser, Bigo Live आणि Mi Community या लोकप्रिय नावांचा समावेश होता.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की, “Tencent आणि Alibaba च्या अनेक अॅप्सनी मालकी लपवण्यासाठी त्यांचे स्वरूप बदलले होते. हे ban केलेलं apps हाँगकाँग, सिंगापूर, इत्यादी सारख्या देशांमधून देखील होस्ट केले जात होते. पण हा सर्व मिळणारा डेटा चीनी सर्व्हरवर ट्रान्स्फर केला जात होता. त्यामुळे हे 54 चिनी ॲप्स मंत्रालयाने Banned केले आहे.
