आज आपण पॉडकास्ट म्हणजे काय? (Podcast Meaning in marathi) आणि पॉडकास्ट बद्दल सर्व माहिती (Podcast information in Marathi) जाणून घेणार आहोत. तसेच आपण पॉडकास्ट चे प्रकार (Types of podcast in Marathi) ह्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. पॉडकास्ट (Podcast) बद्दल तुम्ही अनेक ठिकाणी ऐकले असेल. पण हे नक्की काय असते? पॉडकास्टिंग चे फायदे काय असतात? ह्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे आज आपण पॉडकास्ट विषयी संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत.
इंटरनेट वर व्हिडिओ मधील माहिती पाहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच हल्ली काही माहिती, टिप्स, शैक्षणिक माहिती जाणून घेण्यासाठी गूगल सोबत यूट्यूब चा पर्याय जास्त प्रमाणात वापरला जातो. पॉडकास्ट इंटरनेट च्या दुनियेत खूप लोकप्रिय आहे. पॉडकास्ट चा वापर बाहेर देशात जास्त प्रमाणात केला जातो. पण भारतात जास्त लोकांना पॉडकास्ट बद्दल माहिती नाही आहे. पॉडकास्ट म्हणजे काय? (podcast meaning in marathi) तसेच पॉडकास्ट चे किती प्रकार आहेत? हे आपण आजच्या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..
पॉडकास्ट म्हणजे काय? (Podcast Meaning in Marathi)
पॉडकास्ट म्हणजे इंटरनेट वर मिळणारी डिजीटल ध्वनिफिती. पॉडकास्ट हे इंटरनेट वर ऐकू शकतो. पॉडकास्ट ऑडिओ स्वरूपात इंटरनेट वर उपलब्ध असतात. जे कधीही ऐकू शकतो. पॉडकास्ट किंवा पॉडकास्टिंग म्हणजे एक रेडिओ शो. जो इंटरनेट वर चालवला जातो. ह्याला इंटरनेट रेडिओ देखील म्हटले जाते. पॉडकास्ट हा एका रेडिओ शो सारखाच असतो. फक्त इथे आपण आपल्या इच्छेनुसार कोणतेही पॉडकास्ट ऐकू शकतो. ह्यावर सर्वस्व आपलं नियत्रंण असते.
पॉडकास्ट हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपल्या आवाजात Audio रेकॉर्ड करून कोणत्याही पॉडकास्ट अँप वर किंवा वेबसाईट वर अपलोड करू शकतो. पॉडकास्ट अँप वर ऑडियो एपिसोड किंवा कार्यक्रम ची एक मालिका (series) असते. ज्यामध्ये कोणत्याही एका विषयाबद्दल संपूर्ण माहिती ऑडियो रुपात रेकॉर्ड करून दिलेली असते. ह्यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट ची गरज असते.
हल्ली इंटरनेट वर अनेक प्रकारच्या पॉडकास्ट वेबसाइट आणि Apps उपलब्ध आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही फ्री मध्ये पॉडकास्ट ऐकू शकता. तसेच ऑडियो पॉडकास्ट सोबत व्हिडिओ पॉडकास्ट सुद्धा जास्त प्रमाणात ऐकले जाते.
हे नक्की वाचा:-
▪️ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.
▪️ऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा!
पॉडकास्ट चे प्रकार | Types Of Podcast in Marathi
▶️ व्यक्तिगत पॉडकास्ट (Personal Podcast)
व्यक्तिगत पॉडकास्ट हा एका व्यक्ती द्वारे चालवला जातो. म्हणजेच बनवला जातो. ह्यामध्ये एक व्यक्ती एका विशिष्ट विषयावर त्याचे मत किंवा त्याचा अनुभव लोकांना सांगत असतो. जसे की चालू घडामोडी, प्रेरणादायी गोष्ट, इत्यादी गोष्टी ऑडियो स्वरूपात रेकॉर्ड करून पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर अपलोड केल्या जातात. हा सर्वात सोप्पा व सरळ प्रकार आहे.
▶️ दोन व्यक्तींचे पॉडकास्ट
पॉडकास्ट च्या ह्या प्रकारात दोन व्यक्तींद्वारे पॉडकास्टिंग केले जाते. ह्यामध्ये दोन व्यक्ती मिळून एक ऑडियो रेकॉर्ड करतात व पॉडकास्टिंग वेबसाइट्स, अँप वर अपलोड करतात. तसेच ह्या पॉडकास्टिंग प्रकारात तुम्ही दोन्ही व्यक्तींची बाजू समजून घेऊ शकता. व त्यांचे विचार काय आहेत ते जाणून घेऊ शकता.
▶️ इंटरव्यू पॉडकास्ट (Interview Podcast)
ह्या प्रकारात एका होस्ट द्वारा एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला जातो. ह्यामध्ये होस्ट त्या व्यक्तीला प्रश्न विचारतो. ह्यामध्ये विचारले गेलेलं प्रश्न पॉडकास्ट मध्ये रेकॉर्ड करून ते शेअर केले जातात.
पॉडकास्ट चे फायदे | Benefits Of Podcast in Marathi
पॉडकास्ट चे अनेक फायदे आहेत. पॉडकास्टिंग करून तुम्ही तुमच्या मधील कौशल्य व कलागुण जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला एक विषय निवडून, त्या बद्दल माहिती ऑडियो स्वरूपात रेकॉर्ड करून पॉडकास्टिंग apps व वेबसाइट्स वर अपलोड करायची आहे.
1) तुम्ही कोणतेही काम करत असताना पॉडकास्ट ऐकू शकता.
2) कोणतीही व्यक्ती त्याच्या आवडीचे पॉडकास्ट बनवून शेअर करू शकतो.
3) पॉडकास्ट ही इंटरनेट वरील फ्री सर्व्हिस आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे नाव कमवू शकता.
4) अनेक प्रकारच्या विषयांवर पॉडकास्टिंग उपलब्ध आहे. ती तुम्ही ऐकू शकता. जसे की स्पोर्ट्स, तंत्रज्ञान, शिक्षण, व्यवसाय, डेली न्यूज, मनोरंजन, छोट्या कथा, इत्यादी विषयांवर पॉडकास्ट ऐकू शकता.
5) पॉडकास्टिंग करून तुम्ही पैसे कमवू शकता.
हे नक्की वाचा: गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे?
पॉडकास्ट कसे तयार करायचे? (How to create Podcast in Marathi)
पॉडकास्ट तयार करणे काही कठीण गोष्ट नाहीय. पॉडकास्टिंग किंवा पॉडकास्ट तयार करण्यासाठी तुमच्याकडे फक्त माईक असणे आवश्यक आहे. त्या माईक ने तुमचा ऑडियो रेकॉर्ड करून त्याला व्यवस्थित बॅकग्राऊंड म्युझिक देऊन ती ऑडियो फाईल तुम्ही तयार करू शकता. आहे की नाही सोप्पे! अश्या प्रकारे तुम्ही तुमचा स्वतः चा ऑडियो रेकॉर्ड करून चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक देऊन तो ऑडियो पॉडकास्टिंग App किंवा वेबसाइट्स वर अपलोड करू शकता.
खाली काही पॉडकास्टिंग apps ची नावे दिली आहेत. तिथून तुम्ही फ्री मध्ये पॉडकास्ट ऐकू आणि त्यावर तुम्ही तयार केलेले पॉडकास्टिंग ऑडियो अपलोड करू शकता. जस जस तुमचे पॉडकास्टिंग ऑडियो जास्त लोकांना आवडेल, तस तसे तुम्ही पैसे कमवू शकता.
हे नक्की वाचा: AR म्हणजे काय ? AR चा फुल फॉर्म आणि संपूर्ण माहिती!
पॉडकास्टिंग ऐकण्यासाठी कोणत्या App चा वापर करावा?
- Google Podcasts
- Audible
- Amazon Music
- Podcast Addicte
- Podcast App
- Spotify
- JioSaavan
हे सर्व अँप Google Play Store वर उपलब्ध आहेत. तसेच ह्यावरून तुम्ही पॉडकास्टिंग करू शकता आणि फ्री मध्ये ऐकू शकता.
तुम्हाला ही माहिती वाचून तर पॉडकास्ट म्हणजे काय (podcast meaning in Marathi) आणि त्याचे किती प्रकार असतात. तसेच पॉडकास्ट कसे तयार करायचे? ह्याबद्दल सर्व माहिती मराठी भाषेतून वाचायला मिळाली. तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. तसेच हा लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच तंत्रज्ञानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.
I like it your very important prodcust detail