Google जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे search engine आहे. कोणत्या विषयाची माहिती हवी असो किंवा काहीही सर्वात अगोदर आपण गूगल वर सर्च करतो. प्रत्येक ब्लॉगर ब्लॉग लिहिताना एकाच लक्ष ठेवून ब्लॉग लिहितो ते म्हणजे त्याची प्रत्येक ब्लॉग पोस्ट Google वर दिसली पाहिजे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. वेबसाईट वर जास्त रहदारी आणण्यासाठी गूगल सर्च इंजिन हे एक उत्तम पर्याय आहे.
पण त्यासाठी तुम्हाला Google Search Engine च्या Google Search Console मध्ये तुमची वेबसाईट सबमिट करावी लागेल. वेबसाईट गूगल च्या सर्च रिझल्ट्स मध्ये दिसण्यासाठी गूगल सर्च कन्सोल मध्ये सबमिट करावी लागते.
आजच्या लेखात आपण वेबसाईट गूगल सर्च कन्सोल मध्ये कशी सबमिट करायची? हे जाणून घेणार आहोत.
वेबसाईट गूगल सर्च कन्सोल मध्ये कशी सबमिट करायची?
Step 1: Google Search Console चे Homepage ओपन करा. त्यानंतर Start now वर क्लिक करा.
Step 2: आता तुमच्यासमोर दोन पर्याय येतील. त्याअगोदर तुमच्या वेबसाईट ची URL कॉपी करून घ्या. त्यानंतर त्या दोन पर्यायांपैकी दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा. आणि तिथे वेबसाईट ची URL पेस्ट करा. आणि continue वर क्लिक करा.
Step 3: तुमच्या वेबसाईट ची ownership verify करावी लागेल. त्यासाठी तुमच्यासमोर 5 पर्याय येतील. त्यातील HTML Tag ह्या पर्यायावर क्लिक करा. कारण हा पर्याय सर्वात सोप्पा आहे. तुम्हाला आता एक Meta tag मिळेल. तो Meta tag तुमच्या वेबसाईट च्या HTML मध्ये head section मध्ये add करावा लागेल.
Step 4: आता तो Meta tag कॉपी करून घ्या. नंतर तुमच्या वेबसाईट च्या Theme सेक्शन मध्ये पेस्ट करा. जर तुम्हाला Meta Tag कसा पेस्ट करायचा ते माहीत नसल्यास खालील दिलेली ब्लॉग पोस्ट वाचा.
▪️ Meta Tag वेबसाईट मधील HTML सेक्शन मध्ये कसा पेस्ट करा.
Step 5: नंतर सर्च कन्सोल च्या पेज वर वर परत येऊन Verify वर क्लिक करा. आता तुमची वेबसाईट verify झाली असा एक pop-up मेसेज येईल.
अश्या प्रकारे तुम्ही वेबसाईट Google Search Console मध्ये यशस्वीरीत्या सबमिट केली आहे. आता तुमच्या वेबसाईट चा sitemap सर्च कन्सोल मध्ये सबमिट करा. आता थोड्याच दिवसांनी तुमची वेबसाईट गूगल सर्च रिझल्ट्स मध्ये index व्हायला सुरुवात होईल.
जर तुम्हाला वेबसाईट सबमिट करताना काही प्रोब्लेम आला तर तुम्ही मला संपर्क साधू शकता.
तसेच तंत्रज्ञानाविषयी आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या. तसेच डेली अपडेट्स साठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.
धन्यवाद! जय महाराष्ट्र!