ऑनलाईन कोर्स म्हणजे काय? ऑनलाईन कोर्स कसे करतात? | Online Course information in Marathi

आजच्या ह्या लेखात आपण ऑनलाईन कोर्स म्हणजे काय? आणि ऑनलाईन कोर्स कसे करतात? (Online Course information in Marathi) ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

मित्रांनो व मैत्रिणींनो आजकाल सर्व ठिकाणी ऑनलाईन कोर्सेस ची चर्चा आहे. लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांना घरी बसावे लागले. अश्या वेळी दुसरी नोकरी शोधणे कठीण झाले होते. प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन नोकरी शोधू लागले. त्यामुळे ऑनलाईन जॉब्स चा कल वाढत गेला. पण ऑनलाइन जॉब मिळण्यासाठी डिजिटल स्किल्स असणे आवश्यक आहेत. जसे की, काही कंपन्या डिजिटल मार्केटर, व्हिडिओ एडिटर, फोटो एडिटर सारख्या स्किल्स असणाऱ्या लोकांना ऑनलाईन व ऑफलाईन जॉब ऑफर करतात. त्यामुळे अनेकांना डिजिटल, ऑनलाईन स्किल्स बद्दल माहिती व शिक्षण नसल्यामुळे त्यांना जॉब मिळत नाही.

येणारा युग हा डिजिटल युग आहे. व त्याची सुरुवात सुद्धा झाली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा डिजिटल स्किल्स शिकून घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन कोर्स शिकून तुम्ही पटकन जॉब मिळवू शकता व वेळेची बचत सुद्धा करू शकता. ऑनलाईन कोर्स काही फ्री असतात तर काहींना पैसे द्यावे लागतात. तुम्ही इंटरनेटच्या साहाय्याने मोबाईल मधून ऑनलाईन कोर्स करू शकता.

आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन कोर्स म्हणजे काय? आणि ऑनलाईन कोर्स कसे करतात? त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ह्या माहिती मुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा व तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा.

ऑनलाईन कोर्स म्हणजे काय?

इंटरनेटवर ठराविक वेबसाईट वर उपलब्ध असलेला कोर्स मोबाईलच्या माध्यमाने केला जातो, त्याला ऑनलाईन कोर्स म्हणतात. ऑनलाईन कोर्स व्हिडिओ फॉरमॅट मध्ये वेबसाईट वर उपलब्ध असतात. हे ऑनलाईन कोर्स मोफत किंवा सशुल्क असतात. तसेच कोर्स पूर्ण केल्यानंतर एक डिजिटल सर्टिफिकेट सुद्धा मिळते. कोर्स करण्यासाठी तुमच्याकडे laptop किंवा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

Online Course करून तुम्ही तुमच्या वेळेची बचत करू शकता. तसेच कामासोबत तुमचे शिक्षणही सुरू ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला ऑफिस मध्ये चांगली पोस्ट मिळू शकते. तसेच तुम्हाला जर बाहेरच्या देशातून MBA, CA, बॅचलर ऑफ सायन्स सारख्या Degree करायच्या असतील. पण काही कारणांमुळे तुम्हाला परदेशात जाता येत नसेल. तर तुम्ही भारतातून सुद्धा ह्या Top Degree करू शकता. तसेच ह्या डिग्री तुम्ही Top University मधून करू शकता. व degree पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळते.

ऑनलाईन कोर्स करण्यासाठी कोणत्या वेबसाइट्स बेस्ट आहेत?

सध्या इंटरनेट वर अनेक कंपन्या वेबसाइट्स मार्फत ऑनलाईन कोर्स उपलब्ध करून देत आहेत. ज्यामुळे ऑनलाईन शिक्षण आणून चांगले होत आहे. हे कोर्स एखादा विद्यार्थी सुद्धा करू शकतो व टीचर्स सुद्धा करू शकतात. अनेक एज्युकेशन वेबसाइट्स फ्री व पेड ऑनलाईन कोर्सेस ऑफर करतात. पण सर्व वेबसाईट सेफ आणि चांगल्या असतील, ह्याची खात्री नाही देऊ शकत. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास वेबसाइट्स शोधून काढल्या आहेत. चला तर मग पाहूया..

  • Udemy
  • Upgrad
  • Coursera
  • Internshala
  • edx
  • Simplilearn
  • My Great Learning
  • Learn Digital with Google

वेबसाइट्स बद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेले आर्टिकल नक्की वाचा: »

ऑनलाईन कोर्स करण्यासाठी कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?

  1. स्मार्टफोन किंवा लॅपटॉप
  2. Personal Details (जसे की, स्वतःचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता, इत्यादी)
  3. इंटरनेट कनेक्शन
  4. Paid कोर्स करणार असाल तर ऑनलाईन पेमेंट साठी Debit card किंवा UPI App.

ऑनलाईन कोर्स कसे करतात?

ऑनलाईन कोर्स करण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. सर्वात अगोदर तुम्हाला ज्या क्षेत्रातील ऑनलाईन कोर्स करायचा आहे, ते ठरवा. त्यानंतर खालील दिलेल्या स्टेप्स नुसार ऑनलाईन कोर्स करा.

Step 1 – सर्वात अगोदर Udemy वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर त्या वेबसाईट वर Sign up करून घ्या.

Step 2 – त्यानंतर, तुम्हाला ज्या क्षेत्रातील (field) ऑनलाईन कोर्स करायचा आहे. तो कोर्स तिथे दिलेल्या सर्च बॉक्स मध्ये सर्च करा. (Example, म्हणून आपण Digital Marketing चा कोर्स ग्राह्य धरूया)

Step 3 – डिजिटल मार्केटिंग कोर्स शोधल्यानंतर तुमच्यासमोर त्या संबंधित अनेक रिझल्ट दिसतील. त्यातील जास्त Star Rating असलेला आणि चांगला Review असलेला कोर्स सिलेक्ट करा. तसेच तो कोर्स फ्री आहे की Paid ते सुद्धा चेक करा. (लक्षात ठेवा; जेव्हाही तुम्ही फ्री कोर्स करता तेव्हा तुम्हाला certificate नाही मिळत. फक्त Paid कोर्स ना ऑनलाईन सर्टिफिकेट मिळते)

Step 4 – तुम्हाला हवा तो कोर्स सिलेक्ट केल्यानंतर, खाली तुम्हाला Enroll Now असा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करून तुम्हाला तुमची पर्सनल माहिती भरावी लागेल. ती भरून झाल्यानंतर तुमच्या Email ID वर त्या कोर्स ची लिंक येते. त्यानंतर तुम्ही तो ऑनलाईन कोर्स करू शकता.

Step 5 – जर तुम्ही Paid Course करणार असाल तर माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावे लागते. त्यानंतर तुम्हाला Email ID वर लिंक येते. व कोर्स पूर्ण करू शकत. व त्यानंतर कोर्स पूर्ण झाल्यावर तुमच्या Email ID वर कोर्स certificate pdf स्वरूपात पाठवले जाते. तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

अश्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन कोर्स करू शकता. व तुमच्या ज्ञानात भर घालू शकता.

वरील माहिती वाचून तुम्हाला ऑनलाईन कोर्स म्हणजे काय? आणि ऑनलाईन कोर्स कसे करतात? (Online Course information in Marathi) ह्याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना व सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. टेक टिप्स विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment