e-Aaadhar Card डाऊनलोड करण्यासाठी ह्या ट्रिक चा वापर करा.


आजच्या लेखामध्ये आपण रजिस्टर मोबाईल नंबर वरून आधार कार्ड कसे डाऊनलोड करायचे? (Download e-Aadhaar Card Online in Marathi) हे जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड ची गरज आता सर्व सरकारी कामांसाठी केला जातो. त्यामुळे आधार कार्ड प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे. भारतामध्ये आधार कार्ड अत्यंत आवश्यक डॉक्यूमेंट आहे.

जर तुमच्याकडे आधार कार्ड ची हार्ड कॉपी असेल, तरीही तुम्ही आधार कार्डची कॉपी डाउनलोड करू शकता. आधार कार्ड मोबाईल मध्ये डाउनलोड करण्याची ही सोपी ट्रिक्स आहे. लगेच जाणून घ्या..

आधार कार्ड दोन पद्धतीचे असते. एक म्हणजे जे तुम्हाला सरकार कडून मिळते आणि दुसरे म्हणजे e-Aadhaar.

Aadhar Card भारतात सर्वात स्वस्त वापरले जाणाऱ्या डॉक्यूमेंट्स पैकी एक आहे. आधार कार्ड ची गरज रोजच्या कामात पडते. आधार कार्ड ची गरज बँकेतल्या कामा पासून ते स्वतःच्या कामापर्यंत लागते.


e-Aadhar कार्ड अश्या प्रकारे डाउनलोड करा! (Download e-Aadhar Card Online in Marathi)

>> आधार कार्ड मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट वर जावा.

>> त्यानंतर उजच्या कॉर्नर मध्ये ‘My Aaadhar‘ ऑप्शन वर क्लिक करा.

>> आता Get Aadhaar ऑप्शन सिलेक्ट करा.

>> तुमच्यासमोर अनेक पर्याय येतील, त्यातील “Download Aadhaar” वर क्लिक करा.

>> आता तुम्ही तिथे १२ डिजिट आधार नंबर टाका.

>> नंतर खाली दिलेले Captcha Verification पूर्ण करा.

>> त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.

>> आधार कार्ड शी लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला ६ अंकी OTP येईल.

>> तो तिथे दिलेल्या जागी टाईप करा.

>> त्यानंतर तुमच्या आधारकार्ड ची e-Aaadhar कॉपी डाऊनलोड करा.

टीप:- जेव्हा ही तुम्ही e-Aaadhar PDF मध्ये डाऊनलोड करता. तेव्हा ती PDF ओपन करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड एंटर करावा लागेल. तो पासवर्ड तुमच्या नावातील पाहिले चार अक्षर आणि जन्मवर्ष असा असतो. तसेच तो पासवर्ड Capital मध्ये लिहावा लागतो.
उदाहरणार्थ:-
आधार कार्ड वरील नाव:- SAMEER RAM RAUT
आधार कार्ड वरील जन्म तारीख:- 28-06-1995

आता पासवर्ड असा होईल:- SAME1995

e-Aadhaar Card डाऊनलोड कसे करायचे? हे व्हिडिओ स्वरूपात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.👇🏻👇🏻


अश्या पद्धतीने तुम्ही तुमचे ई-आधार कार्ड डाऊनलोड (Download e-Aadhar Card Online in Marathi) करू शकता. तसेच तुम्ही हे e-Aaadhar कार्ड कोणत्याही सरकारी कामांसाठी वापरू शकता.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्स, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

1 thought on “e-Aaadhar Card डाऊनलोड करण्यासाठी ह्या ट्रिक चा वापर करा.”

Leave a Comment