आज आपण वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा? हे पाहणार आहोत. ह्याच्या साहाय्याने तुम्ही सुद्धा वर्डप्रेस वर ब्लॉग तयार करू शकता.
सध्या सर्वच ऑनलाईन झाल्यामुळे इंटरनेटची मागणी वाढत चालली आहे. घरी बसून ऑनलाईन काम करून पैसे कमवणे शक्य झाल्यापासून अनेकजण हाच पर्याय निवडत आहेत. काहीजण परत लॉकडाऊन मुळे नोकऱ्या मिळत नसल्या कारणाने तर छंद जोपासण्यासाठी अनेक जण ब्लॉगिंग करत आहेत.
ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी अनेक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पण वर्डप्रेस आणि ब्लॉगर हे सर्वात लोकप्रिय ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहेत. ब्लॉगर हे वापरण्यासाठी फ्री असले तर वर्डप्रेस हे उत्तम आहे.
मी स्वतः वर्डप्रेस वापरत असल्याने मी तुम्हाला वर्डप्रेस वरच ब्लॉग सुरु करण्याचा सल्ला देईन. आधीच्या लेखात आपण ब्लॉग कसा सुरु करावा? ह्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली आहेच. या लेखात आपण wordpress.org वर ब्लॉग कसा तयार करायचा ह्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
वर्डप्रेस वर ब्लॉग बनवल्याने तुम्ही नवनवीन फीचर्स चा वापर करू शकता. त्यामुळे तुम्ही चांगला ब्लॉग बनवू शकता. वर्डप्रेसवर ब्लॉग बनवण्यासाठी होस्टिंग व डोमेन खरेदी करावे लागते. डोमेन व होस्टिंग विकत घेण्यासाठी साधारणपणे एका वर्षाला ३,५०० रुपयांपासून खर्च येतो.
पण जर तुम्हाला इतका खर्च करायचा नसेल तर तुम्ही Blogger.com वर फ्री मध्ये ब्लॉग बनवू शकता. त्यासाठी तुम्ही ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा? हा लेख वाचू शकता. व ह्याच्या साहाय्याने ब्लॉग बनवू शकता.
वर्डप्रेस म्हणजे काय? (WordPress information in Marathi)
वर्डप्रेस हे एक सॉफ्टवेअर आहे. वर्डप्रेस हे एक मुक्त स्रोत (Open Source) आहे. ज्याचा वापर ब्लॉगिंग साठी केला जातो. वर्डप्रेस हे विनामूल्य ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे ब्लॉग, वेबसाईट किंवा ई-कॉमर्स स्टोअर देखील तयार करू शकता.
वर्डप्रेस वर ब्लॉग बनवण्यासाठी कोडींग नॉलेज किंवा वेब डिझाईन शिकण्याची गरज नसते. जगातील ४०% वेबसाईट या वर्डप्रेसवर आहेत.
वर्डप्रेस वर ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करण्यासाठी डोमेन आणि होस्टिंग घेणे गरजेचे असते. wordpress.org आणि wordpress.com असे वर्डप्रेस चे दोन प्रकार आहेत. wordpress.com वरून मोफत ब्लॉग बनवता येतो तर wordpress.org वरून ब्लॉग बनवण्यासाठी होस्टिंग व डोमेन घ्यावे लागते.
वर्डप्रेस हे PHP आणि MySQL आधारित सामग्री व्यवस्थापन सिस्टम आहे. वर्डप्रेस वर अनेक प्रकारच्या Themes व Plugins फ्री मध्ये उपलब्ध आहेत. वर्डप्रेस मध्ये अनेक फीचर्स वापरता येतात.
मार्केट मध्ये अनेक होस्टिंग सुविधा देणाऱ्या कंपन्या आहेत. ज्या त्यांच्या सुविधा उत्तम असल्याचा दावा करतात. होस्टिंग घेताना किंमतीबरोबरच सपोर्ट, सीडीएन, डिस्क स्पेस, बँडविड्थ, परफॉर्मन्स, लोकेशन, अपटाईम इत्यादी गोष्टी चेक करून घेतले पाहिजे.
ऑफर चालू असताना जर तुम्ही होस्टिंग विकत घेतले तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. काही होस्टिंग सुविधा देणाऱ्या कंपन्या, Hostinger, BigRock, BlueHost, GoDaddy इत्यादी.
डोमेन व होस्टिंग विकत घेणे सोप्पे आहे. तुम्ही डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग चा वापर करून होस्टिंग विकत घेऊ शकता. मी तुम्हाला होस्टिंगर वरून डोमेन व होस्टिंग विकत घेऊन वर्डप्रेस कसे इंस्टॉल करायचे ते दाखवणार आहे. होस्टिंगर हे स्वस्त आणि सर्वात वेगवान स्पीड देणारी होस्टिंग कंपनी आहे. वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा? ते खालील लेखात पाहूया.
हे नक्की वाचा: गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे बनवावे?
वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा?
१. सर्वात अगोदर गूगल वर Hostinger.com असे सर्च जरा. त्यानंतर Hostinger ची वेबसाईट ओपन करा.
२. तिथे दिलेल्या होस्टिंग टॅबवर क्लिक करा. त्यानंतर Shared Web Hosting वर क्लिक करा. आता तुमच्या गरजेनुसार हवा असणारा प्लॅन चेक करा. व तो सिलेक्ट करा.
३. Add to cart वर क्लिक करा. होस्टिंगर कंपनी त्यांच्या होस्टिंग प्लॅन सोबत एक फ्री डोमेन सुद्धा देते. आता तुम्हाला एक Free Domain मिळेल. सर्वात अगोदर डोमेन नेम निवडून घ्या.
४. आता तुमच्या गूगल अकाउंट ने लॉग इन करून घ्या आणि त्यानंतर Checkout वर क्लिक करून पेमेंट करून घ्या. पेमेंट झाल्यावर डोमेन व होस्टिंग तुमच्या डॅशबोर्डमध्ये ॲड होईल.
~अश्याप्रकरे तुम्ही 5 मिनिटात होस्टिंगर वरून होस्टिंग विकत घेऊ शकता.
हे नक्की वाचा: 20+ रॉयल्टी आणि कॉपीराइट फ्री इमेज वेबसाइट्स!
होस्टिंग विकत घेतल्यानंतर त्यावर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?
६. आता तुमच्यासमोर तुम्ही विकत घेतलेल होस्टिंग आणि डोमेन येईल. तिथे दिलेल्या Manage बटन वर क्लिक करा.
७. आता तुमच्यासमोर होस्टिंगर चे स्वतःचे hPanel ओपन होईल. हे सुद्धा cPanel प्रमाणेच आहे. hPanel वापरण्यास खूप सोप्पे आहे. आता cPanel वर दिलेल्या Auto installer वर क्लिक करा. त्यानंतर एक पेज ओपन होईल त्यात तुमचे नाव, ई-मेल आयडी, युजरनेम, पासवर्ड इत्यादी माहिती टाकून वर्डप्रेस इन्स्टॉल करा.
~झालं तर मग..अश्या प्रकारे तुम्ही होस्टिंगर वर होस्टिंग विकत घेऊन 5 मिनिटात वर्डप्रेस इंस्टॉल करू शकता.
अश्या प्रकारे तुम्ही तुमचा वर्डप्रेस वर ब्लॉग बनवू शकता. तसेच वर्डप्रेस वर ब्लॉग कसा बनवायचा हा लेख आवडल्यास कमेंट्स करून नक्की सांगा. व तुमच्या मित्र मंडळींना नक्की शेअर करा. तसेच वर्डप्रेस वर ब्लॉग बनवताना काही अडचण आल्यास मला संपर्क साधू शकता.
वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा? हा लेख तुम्ही पूर्णपणे वाचला ना. मग आता तुम्ही सुद्धा वर्डप्रेस वर यशस्वीरीत्या वेबसाईट सुरु करू शकता
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा.तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तंत्रज्ञान, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.
धन्यवाद! जय महाराष्ट्र!
ब्लॉग पोस्ट डॉट कॉम मध्ये नॉटऐबल कोरल थिमची सेटिंग कशी करावी