सर्वात बेस्ट आणि स्वस्त वेब होस्टिंग | Hostinger Web Hosting Review


सध्या अनेक मराठी ब्लॉगर्स ब्लॉगिंग कडे वळत आहेत. ब्लॉगिंग करून घरबसल्या पैसे कमावण्याच्या उद्दिष्टाने ब्लॉगर किंवा वर्डप्रेस वरून ब्लॉगिंग करत आहेत. तसेच जेव्हा पासून मराठी ब्लॉग्स ना गूगल ऍडसेन्स ची परवानगी मिळाली आहे. तेव्हा पासून पैसे कमावणे सोप्पे झाले आहे. घरात बसून आता लॅपटॉप आणि मोबाईल वरून फक्त ब्लॉग्स लिहून लाखो रुपये कमवता येऊ शकतात.

ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्हाला कोणत्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वरून ब्लॉगिंग सुरू करायची हे ठरवले पाहिजे. वर्डप्रेस आणि ब्लॉगर ह्या दोन्ही प्लॅटफॉर्म वरून ब्लॉगिंग कशी सुरु करायची? हे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या पोस्ट वर क्लिक करून पाहा.👇🏻

» ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?
» वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरू करायचा?

ब्लॉगर वरून मोफत ब्लॉग बनवता येतो. पण तिथे तुम्हाला जास्त फीचर्स मिळणार नाहीत. म्हणून वर्डप्रेस हा पर्याय उत्तम असेल. पण वर्डप्रेस वर ब्लॉग सुरू करण्यासाठी डोमेन आणि होस्टिंग असणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्ही आरामात ब्लॉग सुरु करू शकता. पण ह्याचा खर्च प्रत्येकाला कमी दरात हवा असतो. म्हणून आजच्या आर्टिकल मध्ये आपण वर्डप्रेस वर ब्लॉग बनवण्यासाठी सर्वात बेस्ट आणि स्वस्त वेब होस्टिंग कोणती आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच त्या वेब होस्टिंग बद्दल मराठी मध्ये रिव्ह्यू पाहणार आहोत.


Hostinger Web Hosting Review in Marathi

होस्टिंगर ही वेब होस्टिंग कंपनी वर्डप्रेस होस्टिंग च्या बाबतीत सर्वात बेस्ट आहे. आणि ह्याचे होस्टिंग प्लॅन्स देखील स्वस्त आहेत. त्यामुळे नवशिक्या ब्लॉगर ला जास्त पैसे खर्च करावे लागत नाही. तसेच होस्टिंगर ही अतिशय चांगली वेब होस्टिंग कंपनी आहे. माझी सुद्धा होस्टिंगर वर वेबसाईट आहे. ह्या कंपनीचे प्लॅन्स स्वस्त आणि चांगले असल्याने ही होस्टिंग कंपनी उत्तम आहे.

आज आपण होस्टिंगर चा मराठी मध्ये रिव्ह्यू करणार आहे. तसेच होस्टिंगर वेब होस्टिंग चे फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घेणार आहोत. तसेच मी खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही होस्टिंग विकत घेतल्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तसेच खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला एक Coupon Code टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या होस्टिंग प्लॅन वर डिस्काउंट मिळेल. Coupon Code साठी मला इंस्टाग्राम वर मेसेज करा.


Hostinger वेब होस्टिंग चे फायदे!

Uptime मध्ये सर्वात बेस्ट

बाकीच्या वेब होस्टिंगप्रमाणे होस्टींगर देखील 99.99% अपटाईम असल्याचा दावा करते. त्यामुळे तुमची वेबसाईट 24 तास ऑनलाईन सुरू राहू शकते. ज्याचा फायदा असा होईल की जास्त विजीटर्स वेबसाईट वर येतील.

वेबसाईट काही सेकंदात लोड होण्यास मदत

वेबसाईट वर जास्त विजीटर्स येण्यासाठी वेबसाईट ही पटकन ओपन होणारी असली पाहिजे. त्यामुळे वेबसाईट ओपन करणारा वेबसाईट सोडून जाणार नाही. वेब होस्टिंग विकत घेताना होस्टिंग स्पीड ही महत्त्वाची आहे. त्यामुळे होस्टिंगर ची होस्टिंग स्पिड उत्तम रित्या काम करते.

वेबसाइट लोड होण्यास तीन सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागल्यास, ४०% लोक ती सोडून देतात.
~नील पटेल

तुमच्या खात्री साठी तुम्ही हा फोटो पाहू शकता. Bitcatcha Server Speed Checker च्या माहिती नुसार होस्टींगरचा परफार्मन्स A+ आहे. त्यामुळे स्पीड च्या बाबतीत होस्टिंगर बेस्ट ठरते.

Bitcatcha-hostinger-Server-Speed-Checker
Bitcatcha hostinger Server Speed Checker

होस्टिंगर चा कस्टमर सपोर्ट

कोणतीही वस्तू किंवा सर्व्हिस खरेदी केल्यानंतर आपल्याला कस्टमर सपोर्ट असणे गरजेचे आहे. ज्यामुळे काही माहिती किंवा प्रोब्लेम आल्यास आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकतो. वेब होस्टिंग विकत घेतल्यानंतर कस्टमर ‘सपोर्ट’ आहे की नाही हे चेक करणे गरजेचे आहे. जर कधी तुमची वेबसाईट काही कारणाने डाऊन झाली तर तुम्ही कस्टमर सपोर्ट सर्व्हिस चा वापर करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता.

होस्टींगर कंपनी कस्टमर सपोर्ट च्या बाबतीत सर्वात बेस्ट आहे. कारण इथे तुम्ही लाईव्ह चॅट द्वारे तुमच्या प्रोब्लेम च उत्तर मिळवू शकता. तुम्हाला काही तासातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तसेच तुम्ही लाईव्ह चॅट द्वारे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या Gmail वर येईल. त्यामुळे पुन्हा पुन्हा चॅट ओपन करत बसण्याची गरज पडणार नाही.

तसेच होस्टिंगर कंपनीचे Hostinger Knowledge Base हे सुद्धा तुमच्या उपयोगी येईल. इथे तुम्हाला वेबसाईट वर येणाऱ्या प्रॉब्लेम्स चे व्हिडिओ रुपात मार्गदर्शन केलेले व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर मिळू शकतात.

मोफत डोमेन नेम

काही वेब होस्टिंग कंपन्या त्यांच्या होस्टिंग प्लॅन मध्ये मोफत डोमेन नेम देत नाहीत. त्यामुळे डोमेन नेम वेगळे खरेदी करून नंतर होस्टिंग ला जोडावे लागते. त्यामुळे खूप वेळ वाया जातो. पण होस्टिंगर वर तुम्हाला होस्टिंग प्लॅन सोबत एक मोफत डोमेन नेम मिळते. ज्यामुळे जास्त खर्च होत नाही. तसेच जर चुकून तुम्ही मोफत डोमेन नेम घ्यायला विसरलात तर काही टेन्शन नाही. तुम्ही होस्टिंगरच्या लाईव्ह चॅटवर संपर्क साधा. ते तुम्हाला मोफत डोमेन घेण्यासाठी तुमची मदत करतील.

सुपरफास्ट वन क्लिक वर्डप्रेस

होस्टींगरच्या स्वतः च्या hPanel वरून तुम्ही One click वर्डप्रेस इन्स्टॉल करू शकता. यामुळे तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज नसले तरी काही टेन्शन नाही. तुमचे काम आरामात होईल. ह्या आर्टिकल च्या शेवटी आपण होस्टींगरवर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करायचे हे जाणून घेणार आहोत.

Free SSL सर्टिफिकेट

सर्व वेबसाईटसाठी SSL सर्टिफिकेट अनिवार्य आहे. त्यामुळे वेबसाईट https:// असणे गरजेचे आहे. त्यामुळेहोस्टिंग प्लॅन विकत घेताना त्यामध्ये SSL सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तसेच अनेक होस्टिंग कंपन्या त्यांच्या अनलिमिटेड होस्टिंग प्लॅन सोबत मोफत अनलिमिटेड SSL देखील देतात. त्यामुळे होस्टींगर सोबत एक SSL सर्टिफिकेट मिळते. परंतु तुम्हाला केवळ एकाच डोमेनसाठी SSL सर्टिफिकेट मोफत मिळते. एकापेक्षा अधिक डोमेन असल्यास तुम्हाला ते विकत घ्यावे लागते.

होस्टींगरचे पॉवरफुल hPanel

होस्टींगरने आपल्या ग्राहकांना चांगली सुविधा आणि चांगले cPanel मिळावे. ह्यासाठी स्वतःचे hPanel तयार केले आहे. ज्यावरून होस्टिंग मॅनेज करणे अगदी सोप्पे बनून जाते. ह्या hPanel मध्ये अनेक सोप्प्या सुविधा आहेत. तसेच hPanel मध्ये तुम्ही डोमेन नेम जोडू शकता, तुमच्या वेबसाईट चे संपूर्ण सर्वर मॅनेज करू शकता, रुट डिरेक्टरी ओपन करू शकता. अश्या अनेक सुविधांचा वापर करू शकता.

ऑनलाईन पेमेंट पद्धत

होस्टींगर कंपनी पूर्वी फक्त डॉलरमध्ये पेमेंट घेत असल्यामुळे अनेकांना त्याच्या डेबिट कार्डवरून पेमेंट करतांना अडचण येत होत्या. परंतु आता होस्टिंगर वरून होस्टिंग प्लॅन खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करताना, तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, Paypal, Skrill अश्या अनेक ऑनलाईन पद्धतींचा वापर करू शकता.


होस्टींगर वर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?

Step 1 – सर्वात अगोदर येथे क्लिक करून होस्टींगरच्या वेबसाईटला भेट द्या. तिथे दिलेल्या होस्टिंग प्लॅन पैकी तुम्हाला हवा असणारा प्लॅन सिलेक्ट करा.

Hostinger Web Hosting Review

Step 2 – त्यानंतर तुम्हाला हवे असणारे डोमेन घ्यायला विसरू नका. कारण होस्टींगर त्यांच्या प्लॅन सोबत १ वर्षासाठी मोफत डोमेन नेम सुद्धा देते.

Hostinger Web Hosting Review

Step 3 – डोमेन निवडून झाल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून घ्या. अश्या प्रकारे तुम्ही होस्टींगर वरून होस्टिंग विकत घेऊ शकता.

तुम्हाला जर होस्टिंगर प्लॅन वर डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम वर मेसेज करा. तिथे मी तुम्हाला Discount Coupon Code देईन. त्याचा वापर करून तुम्ही डिस्काउंट मिळवू शकता.

होस्टिंग प्लॅन सोबत तुम्हाला होस्टींगरचे स्वतःचे कस्टम hPanel देखील मिळते. cPanel प्रमाणेच हे देखील अतिशय सोपे आहे. यात जर तुम्ही होस्टिंग विकत घेऊन नंतर डोमेन नेम विकत घेतले तर डोमेन ऍड करण्यासाठी Add Website वर क्लिक करून तुम्ही तुमचे डोमेन नेम तुमच्या होस्टिंग ला जोडू शकता.

Step 4 – तुम्ही विकत घेतलेल्या डोमेनवर वर्डप्रेस इंस्टॉल करण्यासाठी होस्टिंगरच्या hPanel वर जा. त्यानंतर Auto Installer वर क्लिक करून करा.

Hostinger Web Hosting Review
WordPress Auto Installer

Step 5 – त्यानंतर तिथे दिलेली माहिती भरून घ्या. आणि Next वर क्लिक करा.अशा प्रकारे तुम्ही होस्टींगरवर काही मिनटात तुमची वेबसाईट तयार करू शकता. तसेच तुम्ही तयार केलेल्या वेबसाईट वर लॉग इन करण्यासाठी खाली दिलेली पद्धत वापरा.

Hostinger Web Hosting Review
Hostinger wordpress auto installer form

वर्डप्रेस वेबसाईट वर लॉग इन करण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करा.

1. तुमच्या वेबसाईट चा address गूगल वर सर्च करा. जसे की www.yourwebsite.com.

2. त्यानंतर तुमच्या वेबसाईट च्या समोर www.yourwebsite.com/wp-admin असे सर्च करा. नंतर तुमच्यासमोर तुमच्या वेबसाईट चा लॉग इन पेज ओपन होईल.

3. आता तुम्ही वेबसाईट तयार करताना जो UserName आणि Password टाकला होता. तो तिथे टाकून वेबसाईट ओपन करा.

अश्या पद्धतीने तुम्ही होस्टिंगर वरून होस्टिंग प्लॅन विकत घेऊन 5 मिनिटात वर्डप्रेस वेबसाईट सुरू करू शकता. आणि तुमचे ब्लॉगिंग करिअर सुरू करू शकता. तसेच हा आर्टिकल आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास मला इंस्टाग्राम वर मेसेज करा.

Leave a Comment