SSD म्हणजे काय? SSD की HDD नक्की कोणते आहे फायदेशीर? तसेच SSD आणि HDD मध्ये काय फरक आहे? ते आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
नवीन लॅपटॉप व कॉम्प्युटर घेताना आपल्यासमोर दोन पर्याय उपलब्ध होतात. Hard Disk Drive (HDD) आणि Solid State Drive (SSD). हे दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम आहेत तसेच हे डेटा साठवून ठेवण्यासाठी वापरले जातात. पूर्वीच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये HDD स्टोरेज वापरले जायचे.
पण HDD मुळे लॅपटॉप व इंटरनेट चा वेग व जागेवर फरक पडायचा. पण आजच्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगात लॅपटॉप व कॉम्प्युटर मध्ये एक नव्या प्रकारचा वापर केला जातो. त्या प्रकाराचे नाव आहे SSD स्टोरेज. SSD हा एक नवा स्टोरेज चा प्रकार आहे. जो डेटा स्टोअर करण्यासाठी वापरण्यात येतो. SSD चा फुल फॉर्म सॉलिड स्टेट ड्राईव्ह (Solid State Drive) असा आहे. आजच्या लेखात आपण SSD की HDD स्टोरेज नक्की कोणते आहे फायदेशीर? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.. चला तर जाणून घेऊया..
HDD म्हणजे काय?
HDD म्हणजे Hard Disk Drive. HDD चा वापर डेटा स्टोअर करण्यासाठी करण्यात येतो. HDD स्टोरेज लॅपटॉप व कॉम्प्युटर मध्ये वापरण्यात येते. HDD चा शोध 1956 साली झाला होता. हार्ड डिस्क मध्ये फिरते भाग असतात. डेटा रीड आणि राईट (Data Read & Write) करण्यासाठी हार्ड डिस्क मध्ये हे फिरते भाग असतात. HDD मध्ये तुम्हाला खूप जास्त जागा (Storage) मिळते. बाजारात जास्तीत जास्त लॅपटॉप मध्ये 1TB पर्यंत HDD स्टोरेज उपलब्ध असते. HDD आणि SSD दोन्ही दिसायला तसे सारखेच असतात.
SSD म्हणजे काय?
SSD एक स्टोरेज ड्राईव्ह आहे. SSD हे HDD पेक्षा खूप जलद आहे.SSD मध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. SSD मध्ये फिरते भाग नसतात तर त्यामध्ये फ्लॅश मेमरीचा वापर करण्यात येतो. एसएसडी मधील भाग हे बोर्डवर बसवलेले असतात. अधिक जाणून घेण्यासाठी खालील फोटो पाहू शकता. SSD ही HDD पेक्षा खूप वेगाने काम करते. ज्यामुळे ऍप्लिकेशन, फोटोज् व फाईल्स एका सेकंदात चालू होतात. SSD जलद व वेगाने काम करत असली तरी त्याचे स्टोरेज HDD पेक्षा कमी असते.
SSD चे काही फायदे :-
SSD मुळे तुमचा लॅपटॉप व कॉम्प्युटर अगदी वेगवान होऊ शकतो. तुम्ही SSD मुळे एका सेकंदात तुमचा लॅपटॉप व कॉम्प्युटर बुट अप (Boot Up) करू शकता. पण HDD मध्ये तुम्हाला एक मिनिट थांबाव लागेल. तसेच तुम्ही SSD मध्ये ऍप्लिकेशन, फोटोज्, अँप, गेम्स लवकर चालू होतात. तर HDD मध्ये ह्यासाठी खूप वेळ थांबाव लागतं.SSD मध्ये मोठे अँप, MS ऑफिस, फाईल्स हे HDD च्या तुलनेत लवकर चालू होतात. SSD मुळे लॅपटॉप चा वेग वाढण्यास मदत होते.
SSD मध्ये HDD सारखा फिरता भाग नसल्यामुळे प्रवासामध्ये लॅपटॉप चालू असताना धक्का बसल्यास SSD अगदी सुरक्षित राहील तसेच HDD मध्ये फिरता भाग असल्याने ते डॅमेज होऊ शकते. त्याचसोबत HDD प्रमाणे SSD थोडा सुद्धा आवाज करत नाही. HDD च्या तुलनेत SSD कमी पॉवर वापरते. त्यामुळे लॅपटॉप मध्ये बॅटरीचा वापर कमी होतो. SSD ही HDD च्या तुलनेने लहान व वजनाला खूपच कमी असते. त्यामुळे लॅपटॉप व कॉम्प्युटर मध्ये जास्त जगा घेत नाही. बदलत्या तंत्रज्ञानामुळे SSD चा आकार आजुन कमी झाला आहे. NVMe M.2 SSD प्रकारच्या SSD उपलब्ध आहेत.
SSD चे काही तोटे :-
SSD ही HDD च्या तुलनेत महाग असते. त्यात SSD मध्ये कमी प्रमाणात जगा असल्याने नवीन काही समाविष्ट करताना जुने फाईल्स व फोटोज् डिलीट करावे लागतात. बाजारात HDD ची किंमत कमी आहे तर SSD ची किंमत थोडी अधिक आहे.
• 1TB HDD – 3500-4000 पर्यंत..
• 120GB SSD – 2500-3000 पर्यंत..
SSD खूप वेगाने काम करीत असली तरीही त्याची जागा थोडी कमी आहे. तर HDD मध्ये 1TB जागा उपलब्ध असते. त्यामुळे जास्त फाईल्स व फोटोज् समाविष्ट करता येतात.
HDD चे काही फायदे:-
HDD मध्ये जास्त जागा असल्याने फाईल्स व फोटोज् साठवून ठेवू शकता. SSD पेक्षा HDD मध्ये जास्त जागा उपलब्ध असल्याने तुम्हाला नवीन काही समाविष्ट करताना काही डिलीट करायची गरज भासणार नाही. तसेच HDD ही SSD पेक्षा स्वस्त असते. HDD बाजारात तुम्हाला 3-4 हजारात मिळेल तिथे SSD घेण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल.
HDD चे काही तोटे:-
SSD च्या तुलनेत HDD खूप कमी वेगाने व काम करते. HDD स्टोरेज असणारे लॅपटॉप व कॉम्प्युटर चालू होण्यास मिनिटांचा वेळ घेतात. अँप, गेम्स, मोठे अँप, MS ऑफिस चालू होण्यास जास्त वेळ लागतो. तसेच HDD मध्ये फिरते भाग असल्या कारणाने प्रवासाच्या वेळी लॅपटॉप ला धक्का बसल्यास HDD स्टोरेज डॅमेज होऊ शकते, तर SSD मध्ये फिरते भाग नसल्याने SSD स्टोरेज सुरक्षित राहते. HDD लॅपटॉप/कॉम्प्युटर चा बूट अप (चालू) होण्याचा वेग SSD पेक्षा अधिक आहे.
SSD की HDD नक्की कोणते आहे फायदेशीर?
तर..वर केलेल्या SSD व HDD स्टोरेज च्या तुलनेवरून तुम्हाला SSD म्हणजे काय? SSD की HDD नक्की कोणते आहे फायदेशीर? समजले असेलच की कोणते स्टोरेज फायदेशीर आहे ते. SSD चे काही फायदे असतील तर तोटे सुद्धा आहेत. तसेच HDD चे सुद्धा काही तोटे तर काही फायदे सुद्धा आहेत.
• जर तुम्हाला चांगला वेग आणि चांगला परफॉर्मन्स हवा असेल, तसेच जर तुम्ही कमी जागेमध्ये तुमचं काम चालवू शकता व तुमचे बजेट जर जास्त असेल तर तुम्ही SSD सोबत जाऊ शकता.
• जर तुमचे बजेट थोडे कमी असेल तर तुम्ही HDD सोबत जाऊ शकता. कारण HDD ची किंमत ही SSD पेक्षा कमी असते. तसेच जर तुम्हाला जास्त जागा हवी असेल तर तुम्ही HDD घेऊ शकता. जर तुम्हाला वेग व परफॉर्मन्स थोडाफार चालेल तर तुम्ही आरामात HDD घेऊ शकता. तुमचे पैसेही वाचतील.
Bonus Tip:-
• तुम्ही HDD स्टोरेज वाला लॅपटॉप घेऊन चांगल्या स्पीड साठी बाहेरून 120GB किंवा 512GB SSD तुमच्या लॅपटॉप मध्ये इंस्टॉल करून तुमच्या लॅपटॉप चा वेग व परफॉर्मन्स वाढवू शकता.
SSD म्हणजे काय? SSD की HDD नक्की कोणते आहे फायदेशीर हा मराठी लेख तुम्हाला नक्की आवडला असेल तसेच तुम्हाला ह्याचा उपयोग देखील होईल. हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तसेच अश्याच तंत्रज्ञान विषयी माहितीसाठी आपल्या मराठमोळ्या मराठी टेक कॉर्नर वेबसाईट ला नक्की भेट द्या.